Shrigonda : ‘त्या’ नगरसेवकांवरच आता उपोषणाची वेळ

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा नगररिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके यांनी (दि9 जून) आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. त्याला दोन महिने उलटूनही अद्याप उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर झालेला नाही. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांवर आता उपोषण करण्याची वेळ आली असून उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीचा कार्यक्रम लावावा.  या मागणीसाठी येत्या 15 ऑगस्टपासून भाजप नगरसेवक अशोक खेंडके, नगरसेवक संग्राम घोडके, नगरसेवक शहाजी खेतमाळीस, नगरसेवक रमेश लाढाणे हे श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहेत. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे.

राज्यात जुलै महिन्यात पंचायतसमिती, कृषिउत्पन्न बाजारसमिती, स्वीकृत नगगरसेवक अशा विविध संस्थांच्या पदाधिकारी पदाच्या निवडी झालेल्या आहेत, असे असताना श्रीगोंदा नगरपरिषद उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीसाठी मात्र जाणीवपूर्वक परवानगी नाकारली जात असल्याचा आरोप भाजप नगरसेवकांनी केला आहे. श्रीगोंदा नगरपरिषदेमध्ये भाजपचे पूर्ण बहुमत आहे.
परंतु उपनगराध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे त्यांना जनतेची कामे करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही निवड व्हावी, अशी मागणी भाजप नगरसेवक करत आहेत. त्यामुळे याच मागणीसाठी हे आमरण उपोषण करणार असल्याची माहिती भाजप नगरसेवक अशोक खेंडके यांनी आज माध्यमांशी बोलताना दिली आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here