Shrigonda : तालुक्यात कोरोनाने घेतले आतापर्यंत सहा बळी, आज तालुक्यात कोरोनाचे दोन बळी!

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री

श्रीगोंदा – तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट होतो आहे. दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत चालल्याने तालुक्यासह प्रशासनाची चिंता वाढतच चालली असून यातच श्रीगोंदा शहरातील ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला तर पिंपळगाव पिसा अंतर्गत खरातवाडीतील ६२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. या दोन व्यक्ती मिळून आता तालुक्यातील मृत्यूंची संख्या सहावर पोहोचली आहे.

आज तालुक्यात सर्वाधिक २०० टेस्ट करण्यात आल्या यामध्ये एकूण १९ रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली. यात श्रीगोंदा शहर ससाणेनगर १, शाहुनगर २, म्हातारपिंप्री ८, काष्टी २, पेडगाव २, कोंडेगव्हाण १, लिंपणगाव १, टाकळी लोणार १, घारगाव १ श्रीगोंदा तालुक्यात एकूण रुग्णसंख्या ३५१ इतकी झाली आहे. सध्या १०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर २४० रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, अशी माहिती डॉ. नितीन खामकर यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here