Beed : शहरातील प्रभागनिहाय घनकचरा व्यवस्थापनाला मिळणार दुप्पट यंत्रसामग्री

काेराेनाच्या पार्श्वभूमीवार व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे नगरपालिकेची स्थायी समितीची बैठक
प्रतिनिधी |बीड 
बीड शहरामध्ये मागील काही वर्षापासून नगर पालिकेच्या घंटागाड्यांमार्फत प्रभागातून कचरा गाेळा केला जात. मात्र, पालिकेकडील स्वच्छतेच्या कामासाठीचे मनुष्यबळ आणि अपुऱ्या घंटागाड्यामुळे सर्वच प्रभागात दुसरी फेरी हाेण्यासाठी अधिकचा कालावधी लागत हाेता. अखेर काेराेनाच्या पार्श्वभूमीवार व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे बीड नगर पालिकेची झाली. स्थाायी समितीची बैठकित घनकचरा व्यवस्थापनासाठी कंत्राटचा ठराव घेण्यात आला असून लवरकच दुप्पट घंटागाड्यांसह अन्य यंत्रसामग्रीत वाढ हाेणार आहे, अशी मािहती नगराध्यक्ष डाॅ. भारतभूषण क्षीरसागर यांनी दिली.
काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी संचारबंदी सुरू आहे. यात साेशल डिस्टन्स व अन्य उपाय याेजना बीड शहरामध्ये पालिकेकडून राबवल्या जात आहेत. दरम्यानच्या, स्थायी समितीची बैठक कशाप्रकारचे व कुठे घेणार हा प्रश्न पालिकेतील सभापतींपुढे हाेता. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष डाॅ. क्षीरसागर आणि मुख्याधिकारी डाॅ. उत्कर्ष गुट्टे यांनी ही बैठक  व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे घेण्याचे निश्चित केले. त्यानुसार शुक्रवारी (दि.7) ही बैठक माेबाईलवर व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे सकाळी ११.४५ ते दुपारी एक वाजेपर्यंत घेण्यात आली. या बैठकीस उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, सर्व सभापती, दहा सदस्य उपस्थित हाेते.
व्हिडिओ काॅन्फरन्सद्वारे घेतलेल्या बैठकीमध्ये बीड शहरातील प्रभागनिहाय कचरा संकलनासाठी अमरावती येथील कनक एंटरप्रायजेस यांचे कंत्राटसंदर्भात ठराव घेण्यात आला. यांच्यामार्फत बीड शहरातील सर्व प्रभागनिहाय नगरपालिकेच्या पूर्वीच्या घंटागाडीच्या संख्येत दुप्पट वाढ करणे, कचरा वाहतूक करुन कचरा डेपाेत डंप करणे अन्य सामुग्रीसह मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच बीड शहरातील सर्वच प्रभागामध्ये दरराेज घंटागाडी येणे शक्य हाेईल.
नागरिकांना ओला व सुका कचरा घरात साठवून घंटागाडीची प्रतीक्षा करण्याची गरज भासणार नाही. तसेच शहरातील विद्युत पाेलवरील लाईट बंद पडणे व वेळेवर दुरुस्ती न हाेणे या समस्यावरही उपाय ठरवण्यात आला असून संबंधित कंत्राटदारास मजुरांची संख्या वाढवून दुरुस्तीच्या कामांना प्राधान्य देण्याचे ठरवण्यात आले. शहरातील पाणी पुरवठ्याच्या कामस गती देऊ नियोजित वेळेत हाेणारा पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती यंत्रसामग्री घेण्यासंदर्भातही ठराव घेण्यात आला. या प्रमुख नियाेजनासह अन्य ठरावही घेण्यात आल्याचे नगराध्यक्ष डाॅ. क्षीरसागर यांनी सांगितले.
स्वच्छतेचे मनुष्यबळ परत मिळणार
बीड शहरात सध्या नगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील कर्मचारी आणि सफाई कामगारांद्वारे घंटागाडी व अन्य स्वच्छतेचे कामे केले जात आहे. नव्याने स्वच्छतेसंदर्भात ठरवण्यात आलेल्या कंत्राटामुळे पालिकेचे मनुष्यबळ हे परत मिळणार आहे. स्वच्छता व कचरा व्यवस्थापनासाठी अद्यावत यंत्रणा शहरात दाखल हाेईल.
डाॅ. उत्कर्ष गुट्टे
सुविधा, सुधारणेवर भर
शहरातील प्रभागनिहायक कचरा संकलनासाठी कंत्राट नियुक्त करण्यात अाले अाहे. त्यामुळे लवरकच दुप्पटीने घंटागाडी दाखल हाेतील. नागरिकांना या सुविधांसह विद्युत खांबावरील दुरुस्ती व अन्य कामांच्या सुधारणेवर भर दिला असून त्यादृष्टीने अंमलबजावणी केली जाईल.
डाॅ. भारतभुषण क्षीरसागर, नगराध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here