शितलतरंग : जीवन आणि संघर्ष 

”जिंदगी हर कदम 
          एक नई जंग है ……”
वरील गाणे आपण सर्वांनी ऐकले आहे. त्यातील आशयाची पदोपदी कशी अनुभूती येते, याची प्रचिती येते. आयुष्यात आपल्याला परिस्थितीबरोबर, वेळप्रसंगी स्वतःबरोबर वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करावा लागतो. आपले जीवन आनन्ददायी  करण्यासाठी संघर्ष हा हवाच असतो.

आपण नेहमी समजून घेतले पाहिजे की, जे आपल्याबरोबर घडते आहे, ते आपल्या चांगल्यासाठीच होत आहे. जेव्हा आपण हे शाश्वत सत्य स्वीकारतो, त्यावेळी मन मजबूत होऊन आपण परिस्थितीचा सामना करायला सिद्ध होतो. जर आपण  आशाच हरवून बसलो तर, जीवन आपल्यासाठी कठीण होऊन जाईल. जे लोक संकटांचा सामना करायला तयार नसतात, ते जीवनात यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या जीवनात संघर्षाचे खूप महत्त्व असून आयुष्य त्याशिवाय जीवन सार्थकी लागू शकत नाही. पूर्णत्वास जात नाही.
हे कोणीही सांगू शकत नाही की, त्यांनी त्यांचे आयुष्य संघर्षाविना घालवले. रतन टाटा यांनी आपली नुकसानात असलेली टाटा कंपनी विकायला काढली. पण, त्यांनी त्याही परिस्थितीत हार न मानता नव्याने उभारी घेतली. आज तीच टाटा कंपनी आज यशाच्या शिखरावर आहे. त्यांनी एक छान वाक्य सांगून ठेवले आहे “ups & downs in life are very important to keep us going, because straight line even in a ECG means we r not alive!”

अमिताभ बच्चन यांचा कोलकत्याच्या नोकरीपासून ते या शतकाचा महानायक बनण्याचा प्रवास खूप खडतर. ज्याने मुंबईत आल्यावर खिशात आपले ड्रायव्हिंग लायसन्स ठेवले होते. जर काही करू शकलो नाही तर हार न मानता टॅक्सी चालविण्याची तयारी त्यांनी ठेवली होती. आज संघर्षाच्या जोरावर ते अढळपदी विराजमान झाले आहेत.

धीरूभाई अंबानी यांनी त्यांची कारकीर्द पेट्रोल पंपावर काम करण्यापासून सुरू केली. पण त्यांनी चालू केलेली रिलायन्स कंपनी आज यशाच्या टोकाला पोहोचलेली सर्वांनीच याची देही याची डोळा पाहिली आहे. एक यशस्वी व्यक्तीच्या मागे संघर्षाची एक मोठी मालिका असते. संकटांना न डगमगता प्रयत्न करत, संघर्ष करीत त्यावर मात करायला हवी. जर तुम्ही जसंघर्ष करत असाल, तर तुम्ही यशाच्या नक्की जवळ आहात असे समजा.

प्रत्येकाच्याच आयुष्यात काहींना काही ध्येय जरूर असते. त्याच्या पूर्तीसाठी संघर्ष हा अटळ व अपरिहार्य असतो. दुःखांचा सामना करून यशाचे शिखर गाठता आले पाहिजे.अपयशामुळे न डगमगता याही परिस्थितीत आपल्यात आणि संघर्षात एक सुवर्णमध्य साधता आला तर ताणतणावापासून दूर राहून आंतरिक शांती मिळेल. टोकाचे पाऊल उचलण्यापासून आपण परावृत्त होऊ. तसेच,काही गोष्टी आचरणात आणाव्यात जसे की, ‘हेच माझे भाग्य आहे’ ह्या गोष्टीचा स्वीकार करून ते बदलण्यासाठी प्रयत्न करावेत. भविष्याची स्वप्ने न बघता वर्तमानात जगल्यामुळेही प्रवास सुखकर होईल.

स्वतःला न्याय मिळवून देण्यासाठी प्रत्येक क्षणाला बलिदान, कष्ट ,संघर्षाकडे पाऊल उचलण्याची गरज आहे. कारण,
“असफलता एक चुनौती है,
        इसे स्वीकार करों,
क्या कमी रह गयी ,
            देखों और सुधार करों,
जब तक न सफल हो,
            नींद चैन को त्यागो तुम,
 संघर्ष का मैदान छोडकर,
                  मत भागो तुम
कुछ किये बिना ही,
         जय जयकार नही होती
कोशिश करने वालों की,
             हार नहीं होती………”

4 COMMENTS

  1. Hi there are using WordPress for your site platform? I’m new to the blog world but I’m trying to get started and create my own. Do you require any html coding expertise to make your own blog? Any help would be greatly appreciated!

  2. Write more, thats all I have to say. Literally, it seems as though you relied on the video to make your point. You clearly know what youre talking about, why throw away your intelligence on just posting videos to your weblog when you could be giving us something enlightening to read?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here