हृदय हेलावून टाकणारी निर्दयता , 90 वर्षीय कोरोनाग्रस्त आजीला जंगलात सोडून नातेवाईक पसार

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मनाला सुन्न करणारी, हृदय हेलावून टाकणारी एक निर्दयी औरंगाबाद येथून समोर आली आहे. आपल्या 90 वर्षीय कोरोनाग्रस्त आजीला जंगलात सोडून नातेवाईक पसार झाले आहे. 

औरंगाबादमधील कच्चीघाटी परिसरात काही नातेवाईकांनी आपल्या 90 वर्षीय कोरोनाबाधित आजींना थेट जंगलात सोडलं. पोलिसांनी या आजींना रुग्णालयात दाखल केले आहे. उचपारानंतर त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. या आजींच्या नातेवाईकांचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरोनामुळे अनेक प्रकारची वेगवेगळ्या परिस्थिती समोर ठाकत आहे. मात्र अशा प्रकारे मनाला सुन्न करणारी घटना पहिल्यांदाच समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here