सुशांतची मालमत्ता तर नाहीच त्याने दिलेली फक्त ही भेट आहे माझ्याकडे – रिया चक्रवर्ती

  0

  काय आहे ही भेटवस्तू ?

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सुंशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर मनी लॉन्ड्रिंगचे आरोप करून 15 कोटी रुपये ट्रान्सफर केल्याचा दावा केला आहे. ईडीकडून तिची तब्बल सहा तास चौकशी करण्यात आली. या सर्व पार्श्वभूमीवर रियाने सुशांतच्या काही नोट्स ज्यात सुशांतने रिया आपल्या आयुष्यात आल्याबद्दल धन्यवाद दिले आहे. ही प्रसिद्ध केली. तसेच माझ्याकडे त्याची फक्त एक भेटवस्तू आहे. 

  या नोट्समध्ये सुशांत लिहितो, “मी माझ्या आयुष्यात आनंदी आहे. माझ्या आयुष्यात लिल्लू (रियाचा भाऊ शोविक) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात बेबु (रिया) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात सर (रियाचे वडील) आल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात मॅम (रियाची आई) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. माझ्या आयुष्यात फ्युडी (कुत्रे) आल्यामुळे मी कृतज्ञ आहे. तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात आल्यामुळे मी कृतज्ञ आहे.”

  ही आहे ती भेटवस्तू

  दरम्यान, रिया म्हणते माझ्याकडे सुशांतची कोणतीही मालमत्ता नाही. माझ्याकडे त्याची फक्त एकच भेटवस्तू आहे. ती म्हणजे त्याची पाणी पिण्याची बाटली, असे रियाने म्हटले आहे.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here