Ahmadnagar : कोरोना उपचारादरम्यान आतापर्यंत १०० रुग्णांचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नगर – जिल्ह्यात कोरोना उपचारादरम्यान आतापर्यंत १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आकडेवारीनुसार ही माहिती समोर आली. गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाविरुद्ध प्रशासन लढा देत आहे. त्यातच उपचारादरम्यान १०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिन्यापासून अहमदनगर जिल्ह्यात कोरोना संसर्ग वेगाने वाढला. त्यातच मृत्यूचा आकडा देखील वाढला आहे. सरासरी चार ते सहा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसते, असे असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ६९ टक्क्यापर्यंत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात 12 मार्चला पहिला कोरोना संसर्ग झालेला रुग्ण आढळला. जिल्हा प्रशासनाने त्यावर उपाययोजना राबवित परिस्थिती आटोक्यात ठेवली. त्यावेळी जिल्हा प्रशासनाला लॉकडाऊनची साथ मिळाली. परंतु लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली. केंद्र व राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने अनलॉकची भूमिका घेतली. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने त्यानुसार अंमलबजावणी केली. काही नियम व अटीचे निर्बंध घालून संचारबंदी कायम ठेवून व्यवहार सुरू केले. त्यातच वातावरणातील चढउतार कोरोना संसर्गाला पूरक ठरला आणि गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत वाढ झाली.

अहमदनगर शहरात दररोज सरासरी दोनशे रुग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात देखील परिस्थिती वेगळी नाही. सौम्य, अतिसौम्य आणि गंभीर, असे तीन भाग करून कोरोना रुग्णांवर उपचार सुरू केले आहेत. तरी देखील रुग्णांना उपचारासाठी बेड मिळत नाहीत. त्यातच रुग्ण वाढत आहेत. आता तर मृतांचा आकडा १००  झाला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अधिकच कडक उपयायोजना कराव्या लागणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here