अभिषेक बच्चन कोरोनामुक्त

0

28 दिवसानंतर केली कोरोनावर मात
विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
मुंबई : अमिताभ बच्चन नंतर त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चननेही कोरोनावर मात केली आहे. नुकताच अभिषेकचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे.
अभिषेक बच्चन यांनी स्वत: सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. अभिषेक बच्चन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करुन सर्वांना सांगितले की त्यांची कोविड चाचणी निगेटीव्ह आली आहे. यासह अभिषेकने आपल्या ट्विटमध्ये सर्वांचे आभार व्यक्त केले.
अभिषेकने ट्वीट केले की, ‘वचन वचन आहे. आज दुपारी माझी कोविड चाचणी निगेटीव्ह आली आहे. मी तुम्हाला म्हणालो होतो की मी कोरोनाला हरवेन. मी आणि माझ्या कुटुंबासाठी केलेल्या सर्व प्रार्थनांबद्दल धन्यवाद. नानावटी हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफचे खूप आभार. ’
याआधी अभिषेक बच्चन यांची पत्नी ऐश्वर्या राय आणि मुलगी आराध्या यांनी कोरोना वर मात केली होती. यानंतर महानायक अमिताभ बच्चन यांनाही हॉस्पिटलमधून डिस्चार्ज भेटला होता .आता तब्बल 28 दिवसानंतर अभिषेक बच्चन यानी कोरोना वर मात केल्यामुळे चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here