Shrirampur : अखेर वन अधिकाऱ्यांनी लावला उक्कलगावात पिंजरा

 प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बिबटयाने 2 शेळया 2 कुत्र्याचा उक्कलगावात फडशा पडल्याची ताजी घटना नुकतीच पटेलवाडीजवळ दरंदले वस्तीवर घडली होती. येथील नागरिकांनी वारंवार वनविभागाकडे पिंजरा लावण्याची मागणी केली होती.
परंतू काल बिबट्या मादीचे तीन पिल्ले पटेलवाडी जवळच्या असणार्‍या जगधने यांच्या शेतात सापडल्याने येथील भागात खळबळ उडाली होती. संबंधित शेतकरी बाबा कर्डिले हे उसात फवारणी करीत असताना त्यावेळीच कर्डिले यांना बिबट्या मादीचे तीन पिल्ले उसाच्या सरीला आढळून आले असता त्यांनी फवारणी काम बंद करत प्रकाश थोरात, राजेंद्र जगधने कचरू थोरात, अजित कर्डीले, दीपक जाधव, दीपक थोरात, निलेश कर्डिले, आप्पा गायके, पप्पू कर्डिले, आदी  ग्रामस्थांना यांची कल्पना दिली. तातडीने शेताजवळ दाखल झाले. त्यावेळी उसाच्या शेतात पाहणी केली. त्यावेळीच बिबट्या मादीने तीन पिल्ले त्या ठिकाणाहून पिल्ले दुसरीकडे हलविले होते. शेतकर्‍यांनी पाहणी केल्यानंतर संबंधीतच शेतकर्‍यांनी  वनविभागाचे वनसंरक्षक गाढे यांच्याशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वनविभागाने पटेलवाडी जवळ जगधने उसाच्या शेतात नवीन पिंजरा लावण्यात आला.
येथीलच जगधने हे शेतातून सायंकाळी घरी जात असतानाच त्यावेळी बिबटया अचानक आडवा गेला होता. नेमके कालच असाच प्रसंग घडल्याने आणखी येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बर्‍याच दिवसांपासूनच शेतकर्‍यांच्या तक्रारीनुसार वनविभागाने येथे पिंजरा लावण्यात आला. वनपाल लांडे यांनी घटनास्थळी जाऊन शेतकर्‍यांच्या मदतीने येथे पिंजरा लावला.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here