Rahuri : Corona Updates : कोरोनाची नव्याने 16 जणांना लागण

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राहुरी शहर व तालुक्यात कोरोनाचा प्रार्दूभाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आज दि. ८ अॉगस्ट तालुक्यात नव्याने १६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. यामुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली असून तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या शतक ओलांडून दीड शतकाकडे झपाट्याने वाढत आहे. 

कोरोना रुग्णसंख्येत आज एकाच दिवशी १६ ने  वाढ झाली. यात टाकळीमियाँ येथे ३ पुरुष ५ महिला, असे ८ तर राहुरी कारखाना येथील २ महिला व १ पुरुष असे ३, देवळाली प्रवरा येथे १ पुरुष १ महिला असे २, गुहा येथे १ महिला १ पुरुष असे २, तसेच देसवंडी येथील मुळ पत्ता असलेली १ महिला पॉझिटिव्ह आली असून ती सध्या राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरात राहत असल्याची माहिती समजली आहे, प्रशासनाने घेतलेल्या रँपीड ॲंटीजन टेस्टमधे आजचे १६ रुग्ण आढळून आले. या सर्वांची रँपीड अँटीजन टेस्ट घेण्यात आली होती, अशी माहिती आरोग्य विभागाचे रिपोर्टींग अधिकारी डॉ. किरण खेस म्हाळसकर यांनी दिली.

दरम्यान, तालुक्याची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने प्रशासनासह जनतेमधे प्रचंड खळबळ उडाली आहे,
त्यामुळे तालुक्यात आज जेथे जेथे रुग्णसंख्या आढळून आली. त्या-त्या परिसरात प्रशासनाच्या वतीने जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. तसेच शहर हद्दीतील रुग्ण आढळून आलेल्या तनपुरेवाडी रोड परिसरात नगरपरिषद प्रशासनाकडून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.

यावेळी नगरपरिषदेचे सहा. कर निरीक्षक काकासाहेब शिरसाठ, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र पवार, बांधकाम विभाग प्रमुख बाबासाहेब गुंजाळ, तसेच अफजल पठाण, नरेंद्र मोरे, राहुल जाधव, कुणाल अमृत, सागर जगधने, आदी उपस्थित होते. त्यांनी परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here