Karjat : पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी घेतला पोलीस वसाहतीचा आढावा

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि ८

कर्जत : कर्जत येथील प्रास्तावित पोलीस वसाहतीची शनिवारी सकाळी पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंग यांनी पाहणी करीत पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी चर्चा वरील विषयाबाबत चर्चा केली. लवकरच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्याचा वसाहतीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहे.

अनेक वर्षांपासून जनतेचे रक्षक असणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जुन्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहतीमध्ये आपल्या परिवारासह जीव मुठीत धरून राहत आहेत. जुनी मोडलेली दरवाजे, मोडलेली अथवा कुजलेले कौलारू, त्याला आधार देणारे वाकलेले खांब, परिसरात जप्त केलेला मुद्देमाल, अस्ताव्यस्त पडलेली गुन्ह्यातील वाहने, रात्रीची पुरेशी वीज-व्यवस्था नसल्याने पडलेला काळाकुट्ट अंधाराचे साम्राज्य, वाढलेले गवत आणि काटेरी झुडपे यासह कारागृहातील घाण वाहून नेणाऱ्या गटारीचा दुर्गंध अशा विविध समस्याशी सामना करीत कर्जत पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी पोलीस वसाहतीमध्ये राहत आहे. याबाबत अनेक वेळा वृत्तपत्राच्या माध्यमातून पोलीस वसाहतीच्या प्रश्नावर आवाज उठविला गेला.
सद्यस्थितीत असलेली पोलीस वसाहतीची दुरुस्ती अथवा डागडुजी करण्यात येईल तसेच नवीन वसाहत लवकरच मार्गी लावण्यात येईल असे आश्वासन मिळाले. मात्र कारवाई आणि अंमलबजावणी शून्यच राहिली. नाईलाजास्तव बऱ्याच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी कुटुंबाच्या सुरक्षिततेसाठी आपला बाडा-बिस्तरा खाजगी भाड्याच्या फ्लॅटवर अथवा बंगल्यात हलवला. याच पार्श्वभूमीवर शनिवार दि ८ रोजी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांनी कर्जतच्या जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. तसेच नवीन प्रास्तावित पोलीस वसाहतीमध्ये चार पोलीस अधिकारी आणि ३२ पोलीस कर्मचाऱ्याच्या जागेची बारकाईने पाहणी करीत त्याची नोंद ठेवली.
याबाबत पोलीस उपअधीक्षक संजय सातव आणि पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्याशी चर्चा केली. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार यांच्या पाहणीनंतर पोलीस वसाहतीमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियाना हायसे वाटले. लवकरच पोलीस वसाहतीच्या कामाबाबत सुखद बातमी कानावर ऐकायला येईल अशी अपेक्षा लागली आहे. यावेळी पोलीस अधीक्षक यांचे वाचक पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, कर्जतचे साह्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here