बाईसाहेब जरा धीराने घ्या, सौ. फडणवीसांना माजी पोलीस अधिका-याचे झणझणीत पत्र

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही निशाणा, पाच वर्षात पोलिसांसाठी काय केले ? असा परखड प्रश्न

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढणा-या व मुंबई सुरक्षित नाही, असे ट्विट केल्यानंतर सौ (अमृता) फडणवीस यांना बाईसाहेब जरा धीराने घ्या, असे म्हणत एका माजी पोलीस अधिका-याने अमृता फडणवीसांचे डोळ्यात अंजन घालणारे झणझणीत पत्र लिहिले आहे. या पत्रात या अधिका-याने माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात पोलिसांसाठी काय केले असे म्हणत निशाणा साधला.

या पत्रात त्यांनी अमृता फडणवीस यांना तुम्ही बँकेच्या एक कारकून आहात यापलीकडे आपली ओळख काय, माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी म्हणूनच तुमची ओळख. तुम्हाला पोलिसांचे कामकाज कसे चालते. किंवा कोणत्याही बाबतीतले कायदेशीर ज्ञान आहे का, असे प्रश्न विचारले आहे.

तसेच कोरोना मध्ये पोलीस अहोरात्र सेवा देत आहेत. अनेक जण शहीद झालेत. त्यांच्याबद्दल तुम्ही कधी आपुलकीने विचारणा केली काय कोणाचे सांत्वन तरी केले काय असेही विचारले. तर देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृहखाते ठेवून 5 वर्ष काय केले. पोलीस खात्यासाठी कोणते चांगले निर्णय घेतले, ते माहित असेल तर सांगा. पोलिसाच्या मृत्यूनंतर सकारी घर दोन-तीन महिन्यात खाली करावे लागते. एखाद्या विधवेने याबाबत 5-6 महिने मुदत वाढवून मागितल्यास ती सुद्धा मिळत नसे. सरकारी नियमाप्रमाणे काम होईन, असे भावना शून्य उत्तर मिळत असे.

..असे म्हणत तुम्हाला जर मुंबई सुरक्षित वाटत नसेल तर मग तुम्ही खुशाल उत्तरप्रदेश किंवा बिहारमध्ये राहा, असा सल्लाही पत्राच्या शेवटी दिला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here