पत्रकार थोरात यांना वाळू तस्कारांकडून जीवे मारण्याची धमकी

0

शहर पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीरामपूर /  प्रतिनिधी 

 श्रीरामपूर तालुक्यातील दैनिक राष्ट्र सह्याद्रीचे पत्रकार भरत थोरात यांना ८ रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर पोलिसात गणपत सखाहरी पवार रा उक्कलगाव तालुका श्रीरामपूर येथिल या वाळूतस्कारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

उक्कलगाव येथील पत्रकार थोरात हे काल सकाळी येथील एका हाॅटेलात  चहा पिऊन तेथून जात असताना आरोपी वाळूतस्कार गणपत सखाहरी पवार याने आमच्या विरूध्द वाळूच्या बातम्या छापतो का? तुझे हात पाय तोडू तू बेलापूर व श्रीरामपूरला ये, असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी पत्रकार थोरात यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान काल सायंकाळी उशिरा पोलिसांनी आरोपीस शोधाशोध केली असता मिळून आलेला नाही. याप्रकरणी अधीक तपास हेड काॅ रामेश्वर ढोकणे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here