Editorial : उडत्या तबकड्यांची सुरक्षितता

3

राष्ट्र सह्याद्री 9 ऑगस्ट

वंदे भारत मिशन योजनेंतर्गत आखाती राष्ट्रांत अडकलेल्या भारतीय नागरिकांना भारतात आणले जात आहे. अशाच एका विमानाने दुबईहून केरळमध्ये आणले जात होते. कोझिकोड विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाला. त्यात १८ प्रवाशांचा प्राण गेला. त्याची वेगवेगळी कारणे दिली जात असली, तरी त्यामुळे गेलेले बळी परत येणार नाहीत. असे असले, तरी अन्य विमान अपघातात जसे एकही प्रवाशी वाचत नाही, तसे या अपघातात झाले नाही. दरीत कोसळलेल्या विमानाचे दोन तुकडे झाले, तरी त्यातील बळींची संख्या मर्यादित राहिली. वैमानिक दीपक साठे यांचे ते काैशल्य असल्याचे सांगितले जात आहे.

केरळमधील कोझिकोड येथील करिपूर विमानतळावर अपघात झालेले विमान धावपट्टीवरील जागेच्या अगदी जवळ एक हजार मीटर पुढे खाली उतरले. त्यामुळे वैमानिक विमानाचा वेग कमी करू शकले नाहीत आणि रनवेवर थांबवू शकला नाही; मात्र अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू झाला आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. ‘एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) च्या प्रवक्त्याने सांगितले, की हे विमान वापरात असलेल्या रनवे क्रमांक २८ वर उतरणार होते; परंतु विमान उतरवण्याच्या वैमानिकाला व्यवस्थित दिसली नाही. वैमानिकाच्या विनंतीवरून विमानाला रनवे क्रमांक दहावर उतरण्याची परवानगी देण्यात आली. या धावपट्टीची एकूण लांबी २,7०० मीटर आहे; परंतु मुसळधार पावसामुळे प्रकाश कमी झाल्यामुळे वैमानिकाला निश्चित ठिकाणीदेखील धावपट्टीवर विमान उतरविण्यात अपयश आले.

वैमानिकाला विमानाचा वेग कमी करण्यासाठी पुरेशी जागा मिळू शकली नाही. त्यामुळे विमान दरीत कोसळले आणि त्याचे दोन तुकडे झाले. या अपघातात दोन्ही वैमानिकांसह १८ जणांचा समावेश आहे. विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन्ही डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (डीएफडीआर) आणि कॉकपिट व्हाइस रेकॉर्डर (सीव्हीआर) असतात. पुढील तपासणीसाठी ब्लॅक बॉक्स दिल्लीला आणला जाईल. डीएफडीआरमध्ये विमानाचा वेग, त्याची उंची आणि इंधनाची माहिती असते. सीव्हीआर विमानाच्या कॉकपिटमध्ये संभाषणांची नोंद ठेवते. विमान अपघात अन्वेषण ब्युरोने (एएआयबी) अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. ब्लॅक बॉक्स तपासणीत खूप मदत करते. एव्हिएशन कन्सल्टन्सी फर्म सीएपीए म्हणते, की डीजीसीए आणि एएआयबीने विशेषतः टेबलटॉप विमानतळाच्या सुरक्षेत सर्वसमावेशक सुधारणा घडवून आणण्यासाठी घटनेची तपासणी करून कठोर उपाययोजना केली पाहिजे. आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयन संघटनेच्या करारानुसार पीडितांना नुकसान भरपाई देण्यासाठी पावले उचलली जातील. दहा लाखांची मदत मृतांच्या वारसांना दिली जाणार असली, तरी त्याने गेलेले जीव परत येणार नाही.

अपघातात ठार झालेले वैमानिक कॅप्टन दीपक वसंत साठे हे एअर इंडियाचे एक उत्कृष्ट आणि अनुभवी पायलट होते. त्यांना दहा हजार तासांहून अधिक काळ विमान चालविण्याचा अनुभव होता. सहाय्यक वैमानिक अखिलेश कुमार यांनाही एक हजार 723 तासाचा उड्डाणाचा अनुभव होता. साठे यांनी यापूर्वी या धावपट्टीवर किमान 27 वेळा विमान लँड केले होते. कोझिकोड विमानतळ एएआय चालवित आहे. अलीकडेच या विमानतळाच्या सुरक्षिततेबाबत तक्रार करण्यात आली होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आली. कोझिकोड विमानतळ 13 एप्रिल 1988 रोजी सुरू करण्यात आले. 18 वर्षांनंतर, 2006 मध्ये या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळात रूपांतरित झाले. हे विमानतळ केरळमधील तिसरे आणि भारतातील 11 व्या व्यस्त विमानतळापैकी आहे.

केरळमधील ज्या विमानतळावर हा अपघात झाला, ते टेबलटॉप विमानतळ आहे. टेबलटॉप विमानतळे विमानांच्या उतरण्यासाठी अत्यंत धोकादायक मानले जातात. येथे मोठ्या विमानांचे परिचालन प्रतिबंधित आहे. येथे विमानाचे यशस्वी लँडिंग बहुधा पायलटच्या अनुभवावर आणि समजण्यावर अवलंबून असते, म्हणून येथे उतरताना कोणत्याही प्रकारच्या चुकांना वाव नाही. टेबलटाॅप विमानतळ प्रत्यक्षात डोंगरावर बांधले गेले आहेत. या विमानतळांच्या आसपास किंवा धावपट्टीच्या दोन्ही बाजूला दरी आहे. टेकडीवर विमानतळ बांधल्यामुळे त्यांची धावपट्टी इतर विमानतळांपेक्षा खूपच लहान आहे. टेकड्यांवर विमानतळ बांधण्यासाठी जागा मर्यादेत उपलब्ध असते.  टेकड्या सपाट करण्यासाठी असलेल्या मर्यादा लक्षात घेता तेथे धावपट्या करण्यासही मर्यदा आहेत. या विमानतळांवरील धावपट्टी व सुरक्षितता क्षेत्रही कमी आहे.

हे क्षेत्र योग्य सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी धावपट्टीनंतर विमानाचे अंतर दर्शवते. अशा विमानतळांवर रनवेच्या लांबीव्यतिरिक्त त्यांची रुंदीही कमी असते. भारतात अशी केवळ चार विमानतळ आहेत. यामध्ये केरळमधील कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ, भारतातील मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ, मिझोराममधील लेंगपुई विमानतळ आणि सिक्कीममधील पाक्योंग विमानतळ यांचा समावेश आहे. याशिवाय गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह विमानतळ लँडिंगच्या बाबतीतही धोकादायक मानले जातात. नेपाळचे तालचा विमानतळ, तेन्झिंग विमानतळ, त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळ, टूमलिंगटन विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ आहेत.

नेदरलँडस्‌मधील कॅरिबियन बेटावरील जुआन्चो विमानतळ हे टेबलटॉप विमानतळ आहे. अमेरिकेतील इतर टेबलटॉप विमानतळ म्हणजे कॅलिफोर्नियामधील कॅटालिना विमानतळ, iरिझोनामधील सेडोना विमानतळ, वेस्टर्न व्हर्जिनियामधील यिगर विमानतळ ही टेबलटाॅप विमानतळे आहेत. टेबलटॉप एअरपोर्टवर विमाने उतरविणे कठीण आहे. येथे धावपट्टी करणे ही केवळ एक मोठी समस्याच नाही, तर अशा विमानतळावर वारंवार होणारे हवामानातील बदल विविध समस्या निर्माण करतात. या व्यतिरिक्त, जोरदार वारादेखील वैमानिकांसाठी मोठे आव्हान असते. एवढेच नव्हे तर पावसाळ्यात ही विमानतळे अधिक प्राणघातक ठरतात. ओल्या धावपट्टीमुळे विमान घसरण्याची अधिक भीती असते. येथे वैमानिकांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, की जर धावपट्टीला विामन स्पर्श करू शकणार नसतील, ते विमान परत हवेत घ्या आणि पुन्हा प्रयत्न करा. असे करण्यात अपयशी ठरल्यास विमानाचा अपघात होण्याची शक्यता वाढते. दक्षिण भारतातील अशी विमानतळे दरवर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान अत्यंत धोकादायक बनतात.

कोझिकोड विमानतळावर उतरताना दुर्घटनाग्रस्त झाले. मुसळधार पावसामुळे धावपट्टीवर पाणी साचले होते. त्यामुळे विमान धावपट्टीला मागे सोडून सुमारे ३५ फूट खोल दरीत पडले. विमानतळावर विमानाचे लँडिंग योग्य पद्धतीने झाले नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. कोझिकोड विमानतळाच्या धावपट्टीच्या सभोवताल दरी आहे. टेबलटॉप रनवे संपल्यानंतर अधिक जागा नसते. कोझिकोड विमानतळावरील धावपट्टी संपल्यानंतर विमान ३५ फूट खोल दरीत पडले. खाली पडताच विमानाचे दोन तुकडे झाले. या अपघातात विमानाचे मोठे नुकसान झाले; पण सुदैवाने विमानाला आग लागली नाही. टेबलटाॅप रनवेच्या दोन्ही बाजूंनी किंवा एका बाजूला दरी असल्याने रनवे धोकादायक असतो. अशा परिस्थितीत विमानाच्या लँडिंग आणि उड्डाण दरम्यान दोन्ही गोष्टींमध्ये बराच सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्यामुळे या विमानांचे पायलटही अतिशय कुशल असतात.

या पार्श्वभूमीवर कोझिकोडच्या अपघाताकडे पाहावे लागेल. विमान अतिशय वेगात होते आणि मुसळधार पावसामुळे अंदाज न आल्याने ते धावपट्टीवरून घसरले, असे डीजीसीएकडून सांगण्यात आले. कालिकतमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे विमान पहिल्या प्रयत्नात धावपट्टीवर उतरू शकले नाही. विमानाने दुसऱ्यांदा प्रयत्न केला; पण अंदाज न आल्याने ते धावपट्टी संपते त्याच्याही पुढे गेले आणि आणि घसरले, असे परराष्ट्र मंत्रालयाचे राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.  दुर्घटनेवेळी विमानात १७४ प्रवासी, दहा बालके आणि दोन वैमानिकासह ४ केबिन क्रू मेंबर्स होते. वैमानिक दीपक साठे यांच्या भावाने दिलेली प्रतिक्रिया जास्त महत्त्वाची आहे.

“विमानाचे लँडिग गिअर कार्यरत नव्हते. साठे यांनी विमानाच्या तीन फेऱ्या मारून विमानात असलेले इंधन संपवले. विमानात इंधन नसल्यामुळेच त्याचा अपघात झाल्यानंतरही विमानाने पेट घेतला नाही. विमान खाली उतरवण्यासाठी विमानाचे इंजिन बंद करण्यात आले होते. त्यानंतर तीनदा विमान आदळले; परंतु मोठा अपघात होऊनही त्या वेळी धूर दिसला नाही आणि अनेकांचे प्राण वैमानिकांनी वाचवले,” असे नीलेश साठे यांनी म्हटले आहे. हे सर्व पाहता आता घाईघाईने कोणतेही निष्कर्ष काढणे चुकीचे आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here