Shrirampur : मातुल ठाण येथे बिबट्याच्या हल्ल्याने कालवडीचा मृत्यू

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

मातुल ठाण – श्रीरामपूर तालुक्यातील मातुल ठाण परिसरात काल बिबट्याच्या हल्ल्यामुळे कालवडीचा मृत्यू झाला आहे.

मातुलठाण परिसरात पहिला बिबटया आल्याने परिसरातील शेतकरी व मोल मजुरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी शेतकऱ्यांनी वन विभागाने परिसरात पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होऊ लागली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here