व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री व्हिडीओ चॅनेलचे आज भास्करगिरी महाराजांच्या हस्ते उद्घाटन

0

नगरसह राज्यभर उघडणार माहिती-मनोरंजनाचा खजिना

नक्की पहा डेन केबल नेटवर्कवर 470 क्रमांकाचे चॅनेल

श्रीरामपूर: अल्पावधीतच नगरसह राज्यातील वाचकांच्या पसंतीस उतरलेले ‘दैनिक राष्ट्र सह्याद्री’ आजपासून राज्यव्यापी व्हिडीओ चॅनेल सुरू करीत आहे. “व्हीआयपीज राष्ट्र सह्याद्री” नावाने युट्युबसह केबल नेटवर्कवर सुरू होणाऱ्या या वृत्तवाहिनीचे उद्घाटन श्री क्षेत्र देवगड संस्थानचे मठाधिपती महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते ऑनलाइन स्वरूपात होणार आहे.

गेल्यावर्षी संपादक करण नवले यांच्या संकल्पनेतून दैनिक राष्ट्र सह्याद्री हे वृत्तपत्र सुरू झाले. पहिल्या दिवसापासूनच प्रिंटसह ऑनलाईन सुरू केलेल्या या वृत्तपत्राने जनमानसामध्ये एक वेगळेच स्थान निर्माण केले. कोरोनाच्या संकटामुळे वृत्तपत्र क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अरिष्ट आले मात्र तरीही न डगमगता ऑनलाइनच्या जोरावर राज्य, देशासह परदेशात दैनिक राष्ट्र सह्याद्रीचा बोलबाला वाढतच आहे. व्हीआयपीज ग्रुप ऑफ कंपनीजशी कोलब्रेशन करून सुरू केलेले “व्हीआयपीज वॉलेट” देशभरातील दहा लाखांवर ग्राहक विश्वासाने वापरत आहेत. वाचकांचा उदंड प्रतिसाद व मागणीमुळे राष्ट्र सह्याद्री माध्यम समूह व्हिडीओ चॅनल सुरू करीत आहे.

‘व्हीआयपीज’चे संस्थापक सीईओ विनोद खुटे, ‘राष्ट्र सह्याद्री’च्या संचालिका रजनी शेट्टी, निवासी संपादक भागा वरखडे, व्यवस्थापक प्रबोध शिंदीकर, आवृत्ती प्रमुख प्रदीप आहेर यांच्यासह सर्व कायलयीन प्रतिनिधी, वार्ताहर आणि वितरक सहकाऱ्यांच्या योगदानामुळेच राष्ट्र सह्याद्री माध्यम समूहाची घोडदौड सुरू असल्याची भावना संस्थापक संपादक करण नवले यांनी व्यक्त केली.  न्यव्याने सुरू होणाऱ्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातून समाजाचे वास्तवदर्शी चित्र समोर आणतानाच विकासाचे समीकरण मांडण्याचा प्रयत्न केला जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here