Beed : जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अन्यथा आंदोलन – शितल जाधव

2

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

जगविख्यात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्या, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वाघीण शितल जाधव यांनी दिला आहे.

जगविख्यात अण्णाभाऊ साठे यांनी तळागाळातील जनतेसाठी महान कार्य केले देश-विदेशात आपल्या गायनातून समाज कार्य केले आपल्या गायनातून लोकांचे जनतेचे प्रश्न मांडणारे नेते होते. आपल्या साहित्यातून आणि शाहिरीतून त्यांनी समाजाला जागृत करण्याचे काम व समाजाला वेगळी दिशा दाखवण्याचे काम केले आतापर्यंत सरकारने अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला हवा होता.

सरकारने हा पुरस्कार दिला नाही. देशातील दीनदलित दुबळ्यांचे ते नेते होते. सामाजिक चळवळ त्यांनी चालवली. संपूर्ण देशातील समाजामध्ये त्यांची वेगळी ख्याती होती. शासनाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा. अन्यथा लहुजी शक्ती सेना संपूर्ण देशभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा लहुजी शक्ती सेनेच्या वाघीण शितल जाधव यांनी दिला आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here