Shrigonda : शहरातील कोरोनाचा दुसरा, तर तालुक्यातील सातवा बळी

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा शहरात दोन दिवसांपूर्वीच 55 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यातच आज शहरातील एका 65 वर्षीय महिलेचा नगर येथे उपचारा दरम्यान कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता शहरातील कोरोनाचा दुसरा तर तालुक्यातील हा सातवा बळी ठरला आहे.

कोरोनामुळे मयत झालेल्या महिलेला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे त्या 15 दिवसांपूर्वी शहरातील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट झाल्या होत्या. त्या ठिकाणी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी नगर येथे एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

उपचारादरम्यान आज त्यांचा मृत्यू झाला आहे. याआधी तालुक्यातील बेलवंडी, तांदळी दु, उखलगाव, येळपणे येथील कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच खरातवाडी येथील एक व्यक्ती व शहरातील एक व्यक्ती अशा दोघांचा एकाच दिवशी कोरोनाने बळी घेतला होता. ती घटना ताजी असतानाच आज (दि9) शहरातील या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यामुळे कोरोनाचा शहरातील हा दुसरा बळी तर तालुक्यातील सातवा बळी ठरला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here