Newasa : शहरात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

मेडिकल व दवाखाने वगळता सर्वच ठिकाणी कडकडीत बंद

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

नेवासा – नेवासा शहरात शनिवारी दि.८ जुलै सायंकाळी ५ वाजेपासून सुरू झालेल्या जनता कर्फ्युला रविवारी दि.९ ऑगस्ट रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वत्र कडकडीत बंद दिसून आला फक्त मेडिकल दुकाने व दवाखाने वगळता सर्वच व्यवहार नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते.

नेवासा शहरासह प्रभागातील काही भागात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण सापडल्याचे निदर्शनास आल्यानंतर सर्व व्यापारी, लघु उद्योजक, सर्वपक्षीय पदाधिकारी, व्यावसायिक यांच्या उपस्थितीत सर्वानुमते जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शनिवारी (दि.८) सायंकाळी ५ वाजता जनता कर्फ्यूला सुरुवात झाली. हा कर्फ्यू सोमवार दि.१६ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गावकऱ्यांच्या वतीने जनता कर्फ्यूचा निर्णय झाला असल्याने शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक मंदार जवळे यांनी देखील या जनता कर्फ्यूला पोलीस बंदोबस्त देण्याचे जाहीर केले होते.

जनता कर्फ्यू हा नेवासा शहरातील नागरिकांच्या व त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हितकारक असल्याने रविवारी दि.९ ऑगस्ट रोजी नेवासा शहरातील चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. जनता कर्फ्यू हा गावकऱ्यांच्या वतीने असल्याने नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, सर्व पक्षाचे दोन तीन प्रतिनिधी, पत्रकार, काही सामाजिक कार्यकर्ते अशांची मिळून एक कोरोना ही या कालावधीत तयार करण्यात आली आहे.

जनता कर्फ्यूच्या काळात जो कोणी व्यक्ती दुकाने उघडतांना निदर्शनास आला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे अधिकारही कोरोना कमिटीला दिले गेले असल्याने रस्त्यावरील दुकाने बंद असल्याची निदर्शनास आली. तसेच काहीजण गल्ली बोळात दुकाने उघडी ठेवतांना निदर्शनास आल्यास त्यांच्यावर ही कोरोना कमिटी कार्यवाही करणार तसेच कमिटीतील सदस्य ही गल्ली बोळातील असल्याने आता कोणाकोणावर कार्यवाही होते की दुकानदार व्यावसायिक स्व:त शिस्त पाळून जनता कर्फ्यूला पाठिंबा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here