आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवणार, कर्नाटक सरकारचे आश्वासन

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील आंदोलनांचा परिणाम म्हणून अखेर कर्नाटक सरकारला चूक सुधारावित लागत आहे. बेळगाव प्रशासनाने आठ दिवसात योग्य त्या परवानग्या काढून हा पुतळा पुन्हा बसविणार, असे आश्वासन दिले. 

कर्नाटक महाराष्ट्रातील सीमा भागात असलेल्या बेळगावातील मानगुत्ती या गावात गावक-यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविला होते. याला गावातील एका गटाचा विरोध होता. तो प्रशासनाने रातोरात हटवला. याचे तीव्र पडसाद उमटले. मानगुत्ती गाव व बेळगावसह संपूर्ण महाराष्ट्रात कर्नाटक व भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

त्याचा परिणाम म्हणून कर्नाटक सरकारला अखेर उपरती सुचली आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आठ दिवसात बसविण्याचे आश्वासन दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here