Kada : आष्टी तालुक्यात कोरोनाचा धोका, एकाच दिवशी तब्बल दहा बाधित रुग्ण 

4

नागरिकांनी घाबरू नये, नियमांचे पालन करण्याचे प्रशासनाकडून आवाहन

आष्टीसह ग्रामीण भागात कोरोना बाधित रूग्णांच्या संख्येत वाढत असल्यामुळे चिंता वाढली आहे. शनिवारी रात्री उशीरा प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार एकाच दिवशी दहा रुग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तालुक्यात एकाच दिवशी इतक्या मोठ्या प्रमाणावर पॉझिटिव्ह अहवाल येण्याची पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन तहसीलदार वैभव महिंद्रकर यांनी केले.

आष्टी तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात देखील आता दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर पडताना दिसू लागली आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे, तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे जबाबदारीने पालन करणे आवश्यक आहे. मागील काही दिवसांपूर्वी आष्टीत तीन रुग्ण आढळून आले. परंतू उपचारानंतर ते बरेही झाले आहेत. दि.४ रोजी कडा येथे १७ वर्षीय व हिंगणी येथे ४८ वर्षीय पुरुष असे दोन कोरोना बाधित रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालानुसार निष्पन्न झाले. दि.५ रोजी रात्री प्राप्त झालेल्या अहवालानुसार आष्टी तालुक्यात पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले, तर दि.८ आॅगस्ट रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकाच दिवशी दहा नवे रुग्ण कोरोना बाधित असल्याचे आढळून आल्याने आष्टीकरांची धकधक पुन्हा एकदा वाढली आहे.
तालुक्यात कोरोनाचा धोका वाढला असून ५०, ५०, १८, १४, ३९, ३६, १८, ३२ वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. ३५,१६ वर्षीय महिला आष्टी मुर्शदपुर ५ ,शिराळ २,कडा १, शेरी १,धानोरा येथे १ रुग्ण याप्रमाणे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. एकाच दिवशी तब्बल दहा रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आरोग्य विभागाला सहकार्य करून प्रशासनाने घालून  नियमांचे पालन करावे. असे आवाहन तहसीलदार वैभव महिंद्रकर यांनी केले आहे.
कड्यात रस्त्यांना कुंपन…
कडा परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे नागरीकांच्या चिंतेत पुन्हा एकदा  भर पडली आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी कड्यातील प्रमुख मार्गावरील सर्व रस्त्यांना कुंपन घालून रस्ते बंद करण्यात आले आहेत.
बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींनी पुढे येण्याची गरज….
आष्टी तालुक्यात एकाच दिवशी दहा कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींनी घाबरून न जाता स्वतः हून आरोग्य तपासणीसाठी पुढे येण्याची गरज आहे. तसेच प्रत्येक नागरीकाने आरोग्य विभागाच्या नियमांचे पालन करावे
-डॉ. नितीन मोरे, वैद्यकीय अधिकारी, कडा

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here