फाटके कपडे घाला म्हणजे कोरोनाचा अहवाल ‘निगेटिव्ह’ येईल – माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे

0

सोलापूर काँग्रेसच्या बैठकीतील वक्तव्य, यावर महसूल मंत्री थोरात म्हणाले, सगळे जण खरं मानतील बरं का, यावर एकच हास्याचे फवारे

”चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हचं येतात.” असे विधान माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी भर बैठकीत केलं. शनिवारी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात तसेच महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर ये दोघे सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी काँग्रेस कमिटीमध्ये स्थानिक पदाधिकाऱ्यांची बैठक देखील घेतली. या बैठकीत माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे हे देखील उपस्थित होते. कोरोना विषयी बोलताना सिद्धाराम म्हेत्रे यांनी केलेल्या वक्तव्यामुळे बैठकीत हशा पिकला.

”चांगले कपडे घातले, सूट, बूट घातलं की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येतात. फाटके कपडे घातले की त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह येत नाहीत. त्यांचे रिपोर्ट नेगेटिव्हचं येतात. अशी सगळी कोविडची परिस्थिती आहे. त्यामुळे या कोरोनाला घाबरण्याची गरज नाहीये. त्यामुळे कोविड पॉझिटिव्ह नको असेल तर फाटके कपडे घाला. हे असं सगळीकडे सुरु आहे.” असे सिद्धाराम म्हेत्रे म्हणताच महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांना मध्येच थांबंवल आणि ‘सगळे जण खरं मानतील बरं का’ असे म्हणताच म्हेत्रेंसह सर्व जण हसू लागले. आणि गंभीर सुरु असलेल्या बैठकीत हशा पिकला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here