Shevgaon : नागलवाडी येथील काशी केदारेश्वर देवस्थानचा यात्राउत्सव रद्द

0

देवस्थानने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उचलले पाऊल

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
 
शेवगाव तालुक्यातील नागलवाडी येथील श्री क्षेत्र काशी केदारेश्वर देवस्थानचा आज सोमवारी भरणारा यात्रा उत्सव कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे मठाधिपती महंत बाबागिरी महाराज यांनी दिली.

दरवर्षी श्रावण महिन्यात तिसऱ्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. येथे पुरातन हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. मंदिराच्या पाठीमागे वालमिक ऋषिची समाधी आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला दक्षिणाभिमुखी हनुमान मंदिर आहे. सह्याद्री पर्वताच्या रांगेत हे निसर्गरम्य ठिकाण आहे. रामायण कालीन दंडकारण्याचा हा भाग असून भगवान प्रभू रामचंद्र वनवास संपल्यानंतर रामाने लक्ष्मणाकरवी सिता मातेला वनवास गमन घडवण्यासाठी या ठिकाणी घेऊन आले होते. यावेळी सितामातेला तहान लागल्यानंतर लक्ष्मणाने या ठिकाणी बाण मारला होता. त्या कुंडात आजही जिवंत पाणी आहे.

या ठिकाणी वाल्मिकी ऋषिच्या सानिध्यात राहत असताना सितामातेचे आंघोळीचे कुंड पाहायला मिळते. या ठिकाणी गरम पाण्याचे कुंड देखील होते. परंतु ते कालांतराने नष्ट झाले. याठिकाणी मूळ पुरुष काशिनाथ बाबा यांनी या ठिकाणी संजीवन समाधी घेतली असून तपश्चर्या केल्यानंतर त्यांना भगवान शिवाने वरदान दिले होते की मी या ठिकाणी कायम वास्तव्य करेन आणि त्याप्रमाणे याठिकाणी भगवान शिवाची स्वयंभू पिंड असून त्याची श्रावणी महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी यात्रा भरते.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक दर्शनासाठी येत असतात. परंतु कोरोनच्या या संकटात गर्दीमुळे यात भर पडू नये म्हणून कलेक्टर यांच्या आदेशाचे पालन करत हा यात्रा उत्सव रद्द करण्यात आल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here