प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

माळवाडगांव कोरोना महामारी संकटामुळे मोठ्या महादेवासह इतर देवस्थाने दर्शनासाठी बंद असल्याने पहाटे सुर्योदयाबरोबर गावांतील गोदाकाठावर स्नान करून महादेवाचे दर्शन घेऊ असा विचार करून सकाळी सहा वाजता घरून निघालेल्या महांकळवाडगांव येथील दोन तरुणांचाा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचाही बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी ६.३० चे सुमारास घडली.
सचिन बाजीराव वानखेडे ( २८) भाऊराव पांडूरंग वानखेडे (३५) अशी या दोघांची नावे आहेत .
दोघेही विवाहित असून सचिन याच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी आई, वडील तर भाऊराव यांस पत्नी,३ मुली , एक मुलगा आई , वडील आहे . या घटनेमुळे महांकाळ वाडगांवावर शोककळा पसरली आहे.
सराला गोवर्धन, नाऊर येथील पट्टीचे पोहणारे तरूणाकडून मदतकार्य सुरू असून होडीच्या सहाय्याने भाऊराव यांचा मृतदेह सापडला असून सचिनचा शोध सुरू आहे.