शरद पवारांना आदर्श मानणारे गुलाबराव चव्हाण भाजपमध्ये

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
सिंधुदुर्ग : देशात कोरोनाचा कहर सुरु असताना राजकारण देखील तापत आहे. भाजप आणि महाविकास आघाडीत जोरदार शाब्दिक लढाई सुरु असताना भाजपने आघाडीला जोरदार झटका दिला आहे. शरद पवारांना आदर्श मानणारे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण आता भाजपात दाखल झाले आहेत.
भाजप खासदार नारायण राणे यांच्या निवास्थानी हे राजकीय फेरबदल झालेत. राणे गेल्या काहीदिवसांपासून सरकारवर आरोप करत आहेत. दरम्यान, पवारांच्या समर्थकाला फोडल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक गुलाबराव चव्हाण यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आणि नारायण राणे यांच्या निवासस्थानी हा पक्षांतराचा कार्यक्रम झाला.
गुलाबराव चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चव्हाण यांच्याकडे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालकपदाची जबाबदारी आहे. मात्र जिल्हा बँकेच्या निवडणुकीत हे चित्र पलटण्याची चर्चा सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here