ना. विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव

4

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री
सांगली : मंत्री विश्वजीत कदम यांच्या घरात कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यांच्या कुटुंबातील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. विश्वजीत कदम यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
घरातल्या तिघा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना पुण्यातल्या भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं गेलं आहे. बंधू, वहिनी आणि पुतण्याची कोरोना टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे, असं सांगत माझी प्रकृती ठणठणीत असल्याचं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
माझा पुतण्या डॉ. जितेश कदम याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचप्रमाणे माझे बंधू एच. एम. कदम आणि वहिनी यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आहे. त्यांच्यावर योग्य वैद्यकीय उपचार सुरू आहेत. कोरोना संसर्गाचा मुकाबला करीत डॉ. जितेश हे पलूस-कडेगावसह सांगली-मिरज भागांमध्ये अहोरात्र सेवाकार्य करीत होते, असं विश्वजीत यांनी सांगितलं.
क्वारन्टाईन भागांमधील नागरिकांच्या जेवणाच्या व्यवस्थेपासून सॅनिटायझर,अर्सेनिक अल्बम गोळ्यावाटप अशा अनेक आघाड्यांवर घरातल्या व्यक्ती सर्वसामान्य जनतेला मदत करीत होते. त्यांची तब्येत ठीक असून मी स्वतः उपचारांवर जातीने लक्ष देत आहे. डॉ. जितेश हे लढवय्ये असून कोरोना संसर्गावर मात करून ते पुन्हा जनसेवेसाठी कार्यरत होतील, असा मला विश्वास आहे, असं विश्वजीत म्हणाले.

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here