Feeling sad: फिर मिलेंगे चलते-चलते गायिले…आणि जगाचा निरोप घेतला..!

2

सीआरपीएफ जवान कपील पालवे यांचे अपघाती निधन ;

भारजवाडी येथील दुसरी ह्रदयद्रावक घटना

राजेंद्र शिंदे । राष्ट्र सह्याद्री
टाकळीमानूर :
पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी गावचे सुपुञ  भारतीय सैन्यदात असलेले सीआरपीएफ जवान कपील पालवे यांचे अपघातात निधन झाले. यामुळे भगवानगड परीसर शोकसागरात बुडाला आहे. कपील पालवे हे नुकतेच सुट्टी घेऊन घरी आले होते. दोन दिवसापूर्वी त्यांचा वाढदिवस त्यांनी कुटुंबातील सदस्य व मित्रपरीवारासाबोत साजरा केला होता. कपील पालवे यांचे मातृपितृछत्र लहानपणीच हरवले. कुटुंबात दोन विवाहित बहिणी, कपील व त्यांच्या पत्नी हेच होते. एक वर्षापुर्वी कपील पालवे यांचे लग्न झाले होते. नवीन दाम्पत्यांचा संसार सुखी चालला होता. त्यातच मेजर कपील पालवे यांच्यावर काळाने झडप घालत त्यांना हिरावुन नेले.

देशाच्या सिमेवरती शञुंशी झुंज देण्याचे काम त्यांनी केले होते. निखळ देशभक्तीचा झरा मावळला असल्याने भगवानगड परिसर शोकसागरात बुडाला आहे. अफाट मिञपरीवार असलेले मेजर कपील पालवे यांच्या निधनाने भगवानगड परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

” हम है राही प्यार के… ” 

खरवंडी कासार येथुन सांयकाळी साडेसात वाजता भारजवाडी राहत्या घरी कपील जाण्यासाठी निघाले असता काही मिञांनी त्यांना गाण गाण्याचा आग्रह धरला तेव्हा कपील पालवे यांनी ” हम है राही प्यार के, फिर मिलेंगे चलते चलते  ” तसेच “फुलोने कभी रंगोने पैगाम दिए है, हमने तेरी यादो को कई नाम दिए है ”  हे गीत गायले व निघुन गेले ते कायमचेच.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here