Crime : मुलाने मुलगी पळविली… पित्याला झाडाला बांधून मारहाण!

2

विशेष प्रतिनिधी । राष्ट्र सह्याद्री

मंगळवेढा: मुलीला पळवून नेल्याचा राग मनात धरून चक्क मुलाच्या वडीलास भरचौकात झाडाला बांधून मारहाण करण्याची घटना मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी गावात घडली आहे.
मिळालेली माहिती अशी की भाळवणी गावातील एका मुलीने तिच्या घराशेजारच्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न केले आहे.
या घटनेने संतप्त झालेल्या मुलीचे नातेवाईक चक्क मुलाच्या वडिलाला घरापासून तीन की .मी. अंतरावरून दोरीने बांधून गावापर्यंत मारहाण करत आणले व गावातील भर चौकातील लिंबाच्या झाडाला बांधून मारहाण करण्यात आली.

दरम्यान या घटने नंतर काही क्षणात पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रेय पुजारी व सलगर हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी आल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे त्यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे दरम्यान पोलिसांनी मारहाण प्रकरणातील चौघाला जणांना ताब्यात घेतले. इतर सहभागी आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू असून या प्रकरणात प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे कोरोणाच्या संकटात जमावबंदीचा आदेश असताना सामूहिक रीत्या मारहाण करण्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here