जिल्ह्यात एकूण १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित

0
बीड : जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील  गावांसह  विविध शहरातील एकूण  १७ ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.  परळी वैजनाथ तालुक्यातील दादाहरी वडगाव व नंदनज,गेवराई तालुक्यातील मादळमोही, अंबाजोगाई तालुक्यातील सोमनवाडी , जोगाईवाडी येथील साईसृष्टी पोखरी रोड व सेलू आंबा या गावांमध्ये तसेच
परळी शहरातील बजरंग नगर, सावता माळी मंदिर व पद्मावती नगर, अंबाजोगाई शहरातील गांधीनगर भाग-3 व सोनारा गल्ली, आष्टी शहरातील ग्रामीण रुग्णालयाच्या पाठीमागील परिसर, धारूर शहरातील शिक्षक कॉलनी , शिनगारे गल्ली , उदय नगर व कटघरपुरा गल्ली आणि शिरूर शहरातील सोनार गल्ली गांधी चौक ते इंदिरानगर या परिसरामध्ये सर्व संबंधित ठिकाणी कंटेनमेंट झोन ( Containment Zone)  घोषित करण्यात आले आहे असे आदेशात नमूद केले आहे. वरील संबंधित  परिसरातअनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.  राज्य शासनाने लोक डाऊन कालावधी ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत वाढविला असल्याने त्याअनुषंगाने जिल्ह्यात दिनांक 31 ऑगस्ट २०२० रोजीच्या रात्री १२ पर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता कलम (१) (३) लागू करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here