नगरपरिषदेची घंटागाडीच जेव्हा पेट घेते!

2
श्रीगोंदा : वेळ संध्याकाळी साडे सहा ते सात वाजण्याची शहरातील जुन्या नगरपरिषदेच्या शेजारी काळकाई चौकात नगरपरिषदेच्या घंटा गाडीत नवीन आणलेल्या फॉगिंग मशीनने डास फवारणीचे काम सुरू होते आणि अचानकया गाडीनेच पेट घेतला आणि उपस्थित लोकांच्या काळजाचा ठोकाच चुकला आग एवढी प्रचंड होती की काही क्षणातच या गाडीतून आगीचे लोळ निघत होते.
दैव बलवत्तर म्हणून कुणालाही हानी झाली नाही परंतु या आगीत कचरागाडी मात्र जळून खाक झाली त्याठिकाणी असलेल्या काही तरुणांनी प्रसंगावधान दाखवत ही आग विझवण्याचा जीवापाड प्रयत्न केला त्यानंतर अग्निशामक दलाची गाडी त्याठिकाणी गेली आज दि11 रोजी सायंकाळी ही घटना श्रीगोंदा शहरात घडली आहे दरम्यान याबाबत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे यांना विचारले असता डास फवारणीचे काम करणाऱ्या कर्मच्याऱ्यांना फॉगिंग मशीन व्यवस्थित ऑपरेट न करता आल्यामुळे ही आग लागली आहे तरी संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाई वसूल करू या दुर्घटनेत कुणीही जखमी झाले नसल्याची माहिती देवरे यांनी दिली आहे

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here