मृद संधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांनी बाधले शिवबंधन

सोनई : राज्याचे जल संधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आज अधिकृत पणे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत  मुंबई येथे मातोश्री बंगल्यात  शिवसेनेत प्रवेश केला यावेळी मिलिंद नार्वेकर हे ऊपस्थीत होते.
शंकरराव गडाख हे नेवासा मतदार संघातून अपक्ष म्हणून विजयी झाल्या नंतर सत्ता स्थापन करताना गडाख यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला तर शिवसेनेने गडाख यांना जलसंधारण मंत्रीपद दिले पण नगर जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड यांचे निधन झाल्याने जिल्ह्यातील शिवसेना पोरकी झाली तर नगर जिल्ह्यात शिवसेनेचा एकही आमदार नव्हता.
व शंकरराव गडाख यांच्या सारखा आमदार अनिल राठोड याची उणीव भरून काढू शकतो यामुळे शंकरराव गडाख यांच्या शिवसेना प्रवेशामुळे जिल्ह्यात शिवसेनेची ताकद निश्चितच वाढणार असल्याने शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here