नियामक मंडळाच्या सदस्यपदी डॉ. क्षितीज भैय्या नरेंद्र घुले 

3
ढोरजळगांव: जिल्हा ग्रामीण यंत्रणेच्या (डि आर डी)  नियामक मंडळाच्या सदस्यपदी शेवगाव पंचायत समिती सभापती डॉ क्षितीज भैय्या नरेंद्र घुले  यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
 डॉ क्षितीजभैय्या घुले पाटील यांनी पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वसामान्य व्यक्तीच्या विकासाला केंद्रबिंदू म्हणून आपल्या कार्याला सुरुवात केली त्यात शेतकरी विद्यार्थी व्यवसायिक अगदी हातावर उदरनिर्वाह करणारे कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले जायकवाडी पंपाचा विद्युत पुरवठा पूर्ववत करण्याची मागणी तहसिलदारांना यासंदर्भात निवेदन देऊन पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करून यश मिळवले मुळा कालव्याच्या पाण्याच्या मागणीसाठी भातकुडगाव फाटा येथे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
       ताजनापूर उपसा योजनेसंदर्भात राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची मंत्रालयात भेट घेऊन लेखी निवेदन दिले. शेतकऱ्याच्या तूर पिकास योग्य भाव मिळावा म्हणून शासकीय केंद्र खरेदी केंद्र सुरू केले नुकतेच  जिल्ह्यातील 27,दिव्यांग महिलांना स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत योजनेचा लाभ मिळवून दिला तसेच आजच्या तरुण पिढीतील व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांनी गावातील ग्रामपंचायतीला व्यायाम साधण्यासाठी लाख रुपयांचा निधी मिळवून दिला तसेच  सभापती क्षितीज भैय्या यांच्या माध्यमातुन तालुक्यात गोरगरिब  तसेच जनसामान्य माणसांची कामे लगेच मार्गी लागतात  ते सतत लोकांच्या प्रश्नासाठी कठिबद्ध असतात प्रत्येक समस्यावर तोडगा काढुन त्याच निवारण ते करत असतात तालुक्यात त्यांच्या माध्यमातुन समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात यामध्ये रक्तदान शिबीर ,असतील  आरोग्य शिबीर  ,धार्मीक कार्यक्रम,  युवकांसाठी रोजगारसाठी प्रशिक्षण , रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मेळावे , तसेच तसेच ग्रामिण भागातील होतकरु खेळाडुसाठी सोयी सुविधा उपलब्ध करून देणे तसेच तालुक्यात विविध प्रकारच्या स्पर्धा आयोजित करण्यात येतात तसेच या कोरोनाच्या माहामारीत संकटात सापडलेल्या जनसामान्य ज्यांच हातावर पोट आहे त्यांना आणि इतर गरजु कुंटुबांना जिवनाश्यक वस्तुच वाटप असेल तसेच पुरग्रस्तांना देखील आर्थिक तसेच शौक्षणिक मदत देखील करण्यात आली आहे आशा आनेक समाज उपयोगी कार्य त्यांच अविरत पणे चालु आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here