आपली राज्यघटना…

0

भा रतीय राज्यघटनेची निर्मिती ही विविध स्रोतांपासून झालेली आहे. याचा अर्थ राज्यघटना तयार करताना अनेक देशांच्या राज्यघटनांचाही विचार व अभ्यास केला गेला.
जगामध्ये लिखित आणि अलिखित अशा दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत.जगातील इतर देशांच्या तुलनेत भारताची राज्यघटना मोठी आहे.घटना समितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पंडित नेहरू, डॉ.राजेंद्रप्रसाद, वल्लभभाई, डॉ.राधाकृष्णन, गोपालस्वामी, मुन्शी, कृपलानी, राजगोपालाचारी आदीसह सरोजिनी नायडू, विजयालक्ष्मी पंडित, बेगम दुर्गाबाई, हंसा मेहता, रेणुका रे आदि महिलांचाही समावेश होता
26 जानेवारी 1950 रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी सुरू झाली आणि भारत हे राष्ट्र प्रजासत्ताक गणराज्य बनले.याची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण देशभर भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.राज्यघटना तयार करताना सर्व घटनाकारांनी खूप काळजीपूर्वक व विचारपूर्वक निर्णय घेतलेले आहे.राज्यघटनेमध्ये काही महत्वाची उद्दिष्टे नमूद केलेली आहे ते खालीलप्रमाणे, भारतीय राज्यघटना ही लिखित स्वरूपातील आहे.इतर देशांच्या तुलनेत भारतीय राज्यघटना मोठी आहे. सध्या घटनेमध्ये 24 प्रकरणे, 448 कलमे आणि 12 परिशिष्ट्ये आहेत.
घटना तयार करताना आयर्लंडच्या घटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार केला आहे.अमेरिकन राज्यघटनेवरून मूलभूत हक्क स्विकार करण्यात आले. घटनेमध्ये ताठरता व लवचिकता यांचा समन्वय घातलेला आहे. उदा. एखाद्या राज्याची निर्मिती करायची किंवा त्याचे नाव बदलायचे तेव्हा साध्या बहुमताने होते. पण घटना दुरुस्तीसाठी विशेष बहुमत घ्यावे लागते.या तुलनेत अमेरिकेन राज्यघटना जास्त ताठर आहे.त्यामध्ये सहजासहजी दुरुस्ती करता येत नाही.
घटनेचे महत्वाचे उद्दिष्ट म्हणजे लोककल्याणकारी राज्य. म्हणजेच कोणत्याही धर्म, जात, प्रदेश यांचा भेदभाव न करता समान विकास करणे.
मूलभूत हक्क : हे घटनेच्या भाग 3 मध्ये नमूद आहेत. घटनेतील 22 ते 35 कलम हे मूलभूत हक्क स्पष्ट करतात.
घटनेमध्ये मूलभूत हक्कांसोबत मूलभूत कर्तव्यांचाही समावेश केला आहे.त्यामध्ये एकूण 11कर्तव्ये सांगितली आहे. राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.ही तत्वेआर्थिक, सामाजिक, आरोग्यव मानवी हिताशी संबंधित असतात.
संसदीय शासनपद्धती : हे पुढचे वैशिष्ट्य आहे. देशाच्या कारभारात संसद हे केंद्रस्थानी आहे. तसेच स्वतंत्र न्यायव्यवस्था आहे. वेगवेगळे वाद मिटवण्यासाठी मुक्त न्यायव्यवस्था आहे. भारताने संघराज्य शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे.केंद्र व राज्य सरकारमध्ये केंद्र सरकार जास्त प्रबळ दिसते.आत्ताचच उदा.घ्यायचं झालं तर, अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत परीक्षा रद्द कराव्या या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे पण; केंद्र सरकारचा निर्णय अजून ठाम नाही. राज्यघटनेमध्ये उद्देशपत्रिका स्पष्ट केली आहे. त्यामध्ये सार्वभौम, समाजवादी, लोकशाही राज्याचे स्वरूप स्पष्ट केले आहे. भारत हे एक प्रजासत्ताक राष्ट्र आहे. देशातील सर्वोच्च अधिकार हे लोकांच्या हाती असल्याने भारत हा प्रजासत्ताक आहे.
भारताने एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आहे. राज्यघटनेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, भारत हे एक निधर्मी राष्ट्र आहे. म्हणजेच भारतात विविध धर्माचे लोक राहतात तरीही येथे सर्व धर्म समभाव आहे. घटनेमध्ये नागरिकांना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. मागासलेल्या जाती, जमाती व अल्पसंख्याक यांच्या विकासासाठी तरतुदी आहे. घटनेमध्ये त्रिस्तरीय सरकारची स्थापना केली आहे.केंद्र-राज्य आणि पंचायत राज.पंचायत राजची जिल्हापरिषद-पंचायत समिती व ग्रामपंचायत अशी रचना आहे.
अशाप्रकाररे भारतीय राज्यघटना हि विविधता व वैशिष्ट्यपूर्ण आहे.
– अ‍ॅड. शिवानी संभाजी झाडे
मो. 9766376417

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here