कर्जत – टेम्पो आणि सिमेंट बल्करच्या अपघातात दोन जागीच ठार

कर्जत : तालुक्यातील चिंचोली काळदात चौफुलीवर टेम्पो आणि सिमेंट बल्करच्या अपघातात दोन जण जागीच ठार तर चार जण जखमी झाले आहेत. ठार झालेले दोघे कर्जत -अमरापूर रस्त्यावरील कामाचा एक अभियंता व मजुरांचा समावेश आहे. सदर अपघात बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान घडला.
               याबाबत सविस्तर वृत्त असे की, कर्जत ते अमरापूर रस्त्याचे काम सुरू हे सर्व रस्त्यावर संरक्षक लोखंडी खांब टाकण्याचे काम करतात हे काम सध्या वाकी(ता.आष्टी)याठिकाणी चालू असून हे सर्व जण     सिमेंट भरण्यासाठी जोगेश्वरवाडी येथे आले होते. मालवाहतूक टेम्पोत (एम एच ४३/एफ-५८६) टिकाव, फावडे, घमेले यासह सिमेंटच्या गोण्या टाकून पाच मजूर आणि देखभाल करणारा एक अभियंता असे सहा जण जोगेश्वरवाडी येथून सिमेंट गोन्या घेऊन मिरजगावकडे निघाले होते. ते चिंचोळी चौफुल्यावर आल्यानंतर श्रीगोंदयाकडून जामखेडच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या सिमेंट बल्कर (एम एच ४४/८१८१) ने जोरदार धडक दिली. या धडकेत टेम्पो पूर्ण गोल फिरला आणि क्लिनर च्या दिशेने पलटी झाला. त्यात पुढे बसलेले अभियंता व मजूर खाली सापडून जागीच ठार झाले. तर मागे बसलेले हे चौघे सिमेंट गोण्या खाली दबल्याने जखमी झाले आहेत. यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत. या अपघातात संदीप दादाराव मिरेकर (वय २८ रा मोतखेड ता.लोणार जि. बुलढाणा) व भिवाजी जोगेंद्र जोंधळे (वय २६ रा सोनपल्ली ता श्रीकोंडा जि आदीलाबाद) हे दोघे जागीच ठार झाले असून विष्णू राम वेताळकर (वय-२६)  व विनोद सुभाष गुंजकर वय २६ (दोघे रा उकळी ता.मेखर जि बुलडाणा),नितीन रामभाऊ हुलगुंडे (वय २१ रा माजलगाव ता माजलगाव जि बीड), गोपाळ अशोक पवार (वय २४ रा भोदखेड ता मेखर जि बुलढाणा) हे चौघे गंभीर जखमी झाले आहेत.  अपघात घडल्यानंतर  उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड, पोलीस कर्मचारी प्रमोद हंचे घटनास्थळी दाखल होत ग्रामस्थांच्या मदतीने मदतकार्य सुरू केले. तसेच अपघातग्रस्त टेम्पो व मृतदेह यंत्राच्या मदतीने  काढण्यात आले. जामखेडकडे अपघात करून पळून जाणारा कंटेनर टाकळी खंडेश्वरी येथील तलावाच्या सांडव्या जवळ बेवारस स्थितीत आढळून आला आहे.
Attachments area

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here