ना जल्लोष, ना देखावे, यंदा विघ्नहर्त्यावरच कोरोनाचे विघ्न! 

3

प्रतिनिधी | शिरूरकासार | जगन्नाथ परजणे

अनेक वर्षांपासून मोठ्या उत्साहात येणारा उत्सव म्हणजे गणेश उत्सव मुंबई, पुण्यासह राज्य भरात मोठ्या जल्लोषात दहा दिवस साजरा होणाऱ्या या लाडक्या विघ्नहर्ताच्या यंदा काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या कार्यक्रमावर कोरोनाचे विघ्न आल्याने राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये या मोठ्या उत्साहावर विरजण पडले आहे.

बाळ गंगाधर टिळकांनी देश पारतंत्र्यात असताना देशवासीय एकत्रितपणे रहावेत व देशाला लवकर स्वातंत्र्य मिळावे म्हणून क्रांतिकारी टिळकांनी या गणेश उत्साहाला सार्वजनिक स्वरुप दिले. यातून एकी होऊन अनेक क्रांतिकारक निर्माण झाले. अन् भारतमातेला स्वातंत्र्य मिळाले. टिळकांनी निर्माण केलेल्या उत्सवाने जोर धरला हा उत्सव राज्यासह देशभराचा उत्सव सातासमुद्रापार गेला. तेथेही मोठ्या उत्साहात गणपती बप्पांचा हा उत्सव साजरा होत होता. गेली अनेक वर्षे गणरायाच्या उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला.

मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, कोल्हापूर, सांगली सातारा, नगर, मराठवाडा, बीड विदर्भासह राज्य भरातील सर्वच गावा गावात आजपर्यंत लहान बालकांपासून, तरुण ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनीच उत्सव काळात देखावे, मनोरंजन पर कार्यक्रम, ढोल ताषांची मनमोहक अदा अशी अनेक रंजक कार्यक्रम होत होती. त्याचा आनंद मिळत होता.

दहा दिवस गणरायाच्या नावाचा जयघोष होत होता. यावर्षी मात्र विघ्नहर्तावरच कोरोनाचे विघ्न घोंगावल्याने ना जल्लोष, ना देखावे, ना मनोरंजन कार्यक्रम, त्यामुळे सर्वाचाच हिरमोड झाला असून यावर्षी गणरायाचा उत्सव साध्या पद्धतीने होणार  असल्याचे दु:ख प्रत्येकाच्या मनामनात बोचत आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here