Shrigonda : नेटवर्क मिळत नसल्याने तालुक्यातील ग्राहक त्रस्त

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत या ठिकाणी फोन सुरू असताना अचानक कट होणे, फोर-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे थ्री-जी वा टू-जीची सेवा मिळण्यासारखे प्रकार जिओ ग्राहकांसोबत घडले. सुमारे अर्धा ते एक तास चाललेल्या या प्रकारामुळे ग्राहकांनी नेटवर्कवर नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांमध्ये आयडियासह सर्व मोबाइल नेटवर्क कंपन्यांच्या सेवेमध्ये समस्या आढळून आल्या आहेत. व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जीओ, बीएसएनएल अशा सर्वच कंपन्यांचे कॉल ड्रॉप होण्याची वारंवारता वाढली आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. हातात महागडा स्मार्टफोन असूनही नेटवर्क नसल्यास उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.  सकाळी दहा ते अकरा वाजता दरम्यान शहरातील आयडियाच्या ग्राहकांना मोबाइलमध्ये ‘नो नेटवर्क’ असे आढळले. नेटवर्क दर्शविणाऱ्या दांड्यादेखील मोबाइलमध्ये दिसत नव्हत्या.

नेटवर्क नसल्यामुळे कॉल लावणे वा आलेला कॉल स्वीकारण्यात अडचण निर्माण झाली. डेटा कनेक्शनदेखील सुरू नव्हते. काही वेळाने केवळ डेटा कनेक्शन सुरू होते. पण, कॉल स्वीकारता वा करता येत नव्हता. दरम्यान, शहरातील विविध भागांमधून आयडियाच्या ग्राहकांना या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रारींचा वाढता ओघ पाहता कंपनीतर्फे तांत्रिक समस्या सोडविण्यात आली. मात्र, ती काही काळापुरती. त्यानंतर नेटवर्क नेहमीप्रमाणे झाले.

सर्वांचे हाल सारखेच
सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलीकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून येते.

बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर खासगी मोबाइल नेटवर्क कंपन्यांचेही तेच हाल आहेत. कॉल ड्रॉपची समस्या सर्वाधिक असल्याची ओरड सातत्याने ग्राहकांकडून होत आहे, हे विशेष!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here