Shrigonda : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी प्रसाद नागवडे

प्रतिनिधी | राष्ट्रवादी 

श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील युवा कार्यकर्ता प्रसाद नागवडे याची माजी आमदार राहुल जगताप यांच्या आदेशसानुसार राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीचे पत्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष विजय खेतमाळीस यांनी दिले आहे. 

श्रीगोंदा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी करण्यासाठी व युवकांची मोठ्या प्रमाणात फळी निर्माण करण्यासाठी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार याचे विचार तळागाळात रुजविण्यासाठी माजी आमदार राहुल जगताप यांनी त्यांचे वांगदरी येथील खंदे समर्थक तसेच युवा कार्यकर्ता प्रसाद नागवडे यांची श्रीगोंदा तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे.

निवड झाल्यानंतर प्रसाद नागवडे यांनी सांगितले की तालुक्यातील विध्यार्थी व युवक यांची मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण करून गाव तेथे राष्टवादीची शाखा स्थापन करणार तसेच विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी आमदार राहुल जगताप यांच्या माध्यमातून सोडविणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here