Karjat : उपविभागीय कृषी अधिकारीपदी प्रवीण गवांदे

0
प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कर्जत : कर्जतच्या उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून नुकताच प्रवीण गवांदे यांनी बुधवारी (दि १२) पदभार स्वीकारला असून उपविभागात आगामी काळात चांगली कामे करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
कृषी विभागात यापूर्वी त्यांनी वाडा, पालघर येथे काम केलेले आहे. यासह नाशिक येथे आत्मा योजनेत यशस्वी कार्य पार पाडले आहे. नगर जिल्ह्यात ही अतिशय उत्कृष्टपणे त्यांनी जामखेड, संगमनेर, अकोले या ठिकाणी आपली सेवा बजावली आहे. आपल्या कार्यकाळात शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करून शेतकरी बांधवांना स्वावलंबी करण्यासाठी काम करण्याचा मानस असून नगर जिल्ह्यातील शेतकरी सक्षम करण्यासाठी शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात येतील, असे म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here