Karjat : कोरोना साडे-तीनशे पार, रुग्णसंख्या @ ३५२

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 
कर्जत : कर्जत शहरासह मिरजगाव आणि आंबीजळगाव येथील ७  कोरोनाबाधीत व्यक्तीचा अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णाची एकूण संख्या ३५२ झाली असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. गुरुवारी कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधीत रुग्णानी साडे-तीनशेचा टप्पा पार केला आहे. 

गुरुवार, दि १३ रोजी कर्जत तालुक्यातील एकूण सात व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला आहे. यामध्ये कर्जत शहर ४, मिरजगाव १ आणि आंबीजळगाव येथील २ अशा कोरोनाबाधित व्यक्तीचा समावेश आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांनी साडेतीनशेचा टप्पा पार केला असून एकूण ३५२ व्यक्ती कर्जत तालुक्यात आढळून आले आहेत. यामध्ये कर्जत शहरातील ४५ तर ग्रामीण भागातील ३०७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आज मितीस कर्जत तालुक्यात एकूण १८८ कोरोना रुग्ण ऍक्टिव्ह असून तालुक्यातील एकूण १० व्यक्तीचा उपचार घेत असताना कोरोनाने दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
दिवसें-दिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेक गरजवंतांना उपचार कामासाठी बेड उपलब्ध होत नाही. यासह रुग्णालयात दाखल होताना असंख्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तालुक्यातील आणि शहरातील कोव्हिड सेंटरची अधिक माहिती आणि याविषयी मार्गदर्शन मिळण्यासाठी नगरसेवक सचिन घुले यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते. याच आधारावर सिद्धटेक येथील कोरोनाबाधित व्यक्तीला बेड उपलब्ध होत नव्हते. यासाठी एका तरुणाने विविध राजकीय पदाधिकारी यांना संपर्क केला.
मात्र, त्यास कोणी प्रतिसाद दिला नाही. यावेळी त्या तरुणाने नगरसेवक घुले यांना कॉल केला आणि त्या कोरोनाबाधित व्यक्तीला तात्काळ बेड उपलब्ध झाले म्हणून सदर तरुणाने सोशल मिडियावर घुले यांना धन्यवाद दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here