पार्थ पवार सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या भेटीला, सुप्रिया सुळे करणार मध्यस्थी ?

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि पवार कुटुंबातील ज्येष्ठ शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर पवार कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. या सर्व पार्श्वभूमीवर पार्थ पवार सिल्व्हर ओकवर शरद पवार यांना भेटायला गेले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे देखील तेथे उपस्थित आहेत. सुप्रिया सुळे या आजोबा -नातवांचे वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करीत आहे, अशी चर्चा आहे.

पार्थ पवार याने सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी सीबीआय तपासणीची मागणी केली. तर राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याच्या दिवशी जय श्रीराम ट्विट केले होते. तर शरद पवार यांची भूमिका दोन्ही प्रकरणात एकदम विरुद्ध आहे. पार्थ पवारांच्या अशा वागण्याबाबत शरद पवार यांना विचारले असता पार्थच्या वक्तव्याला कवडीची किंमत नाही. तो अजून अपरिपक्व आहे, असे शरद पवार यांनी सांगितले. तेव्हापासून पवार कुटुंबातील वाद मोठ्या प्रमाणावर उफाळून आल्याचा दिसले.

तसेच शरद पवार यांच्या या वक्तव्याची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. तसेच वेगवेगळ्या राजकीय अंगाने देखील हे मुद्दे चर्चेचा विषय ठरले. त्यामुळे पार्थ यांच्या शरद पवारांच्या भेटीकडे मोठे लक्ष लागले आहे. आता सुप्रिया सुळे आजोबा आणि नातवामधील वाद मिटविण्यात यशस्वी होतात का , पार्थ पवार आजोबांची माफी मागणार की बंड पुकारणार या सगळ्या गोष्टींकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here