Poem: माणसांनो माणसांशी माणसासारखे वागा ना……!!

0
माणसंच येतात सदा माणसांच्या कामी
माणसालाच हवी असते माणसाची हमी
आतातरी माणसांनो माणुसकीला जागा ना
माणसांनो माणसांशी माणसासारखे वागा ना …..!!
माणसाला हवा कशाला जीवंतपणीअहंकार
माणसाचा देह नश्वर ,अन सौंदर्याचे अलंकार
सरता शेवटी सर्वांचा एकच असतो तागा ना
माणसांनो माणसांशी माणसासारखे वागा ना…!!
माणसांनाच फसवण्यात चालली माणसाची हयात
माणसांशीच प्रेम करून जागा करा हृदयात
माणसांच्या मळ्यात फुलवा, तूम्ही फुलोऱ्या बागा ना
माणसांनो माणसांशी माणसासारखे वागा ना……!!
माणूस म्हणून जन्म दे रे, हे प्रभू मला
माणूस म्हणून नांदेल मी, वचन देतो तुला
नाही समजलो या जन्मात मी एक अभागा ना
माणसांनो माणसांशी माणसासारखे वागा ना……!!
आजूबाजूला माणसंच आहेत त्यांच्याकडे बघा ना…!!
 :श्री.रज्जाक शेख
अहमदनगर
दुरभाष ९६६५७७८५५८

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here