Sangamner : आज पुन्हा १९ जणांना बाधा…एकूण बाधित रुग्ण संख्या अकराशे पार…

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

संगमनेरमध्ये कोरोना चक्र थांबण्याचे नाव घेत नसून दिवसेंदिवस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. आज रात्री उशिरा 19 जणांचा तर काल 29 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याची एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 1114 वर जाऊन पोहचली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात 7 रुग्णांचे  अहवाल हे खाजगी प्रयोगशाळेतून तर उर्वरित अहवाल अँटीजन टेस्टचे आहेत.आज आलेल्या खाजगी प्रयोगशाळेतील अहवालानुसार शहरातील इंदिरानगर येथील 59 वर्षीय पुरुष, शिवाजीनगर येथील 31 वर्षीय युवक, जनता नगर येथील 72 वर्षीय वृद्ध महिला, पावबाकी रोड 45 वर्षीय महिला, गणेश नगर 42 वर्षीय महिला तालुक्यातील निमोण येथील 39 वर्षीय व्यक्ती, राजपूर येथील 32 वर्षीय महिला या 7 जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर  अँटीजन टेस्ट मधून शहरातील भारत नगर 59 वर्षीय पुरुष, सय्यद बाबा चौक 62 वर्षीय पुरुष, खंडोबा गल्ली 16 वर्षीय तरुणी, 35 व 66 वर्षीय महिला, घोडेकर मळा 48 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण तालुक्यातील पिंपळगाव देपा येथील 30 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 25 वर्षीय तरुण, चिंचोली गुरव येथील 45 वर्षीय पुरुष, ढोलेवाडी येथील 49 वर्षीय महिला व दीड वर्षीय बलिका असा 12 जनांचा समावेश आहे.

तालुक्यात आत्तापर्यंत 1114 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यामध्ये 495 रुग्ण हे शहरातील आहेत तर 619 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहेत. तसेच आत्तापर्यंत 883 जनांनी कोरोनावर मात केली आहे तर 22 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. सद्यस्थितीत 209 जणांवर उपचार सुरू आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here