क्रिकेट विश्वासाठी आजचा दिवस आहे खूप खास, जाणून घ्या काय कारण

  0

  प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

  आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आज 14 ऑगस्ट हा दिवस खूप विशेष मानला जातो. कारण 14 ऑगस्ट ही ती तारीख आहे जेव्हा क्रिकेट विश्वातील एका ज्येष्ठ ता-याचा अस्त झाला. अन् याच तारखेला दुस-या एका ता-याचा उदय झाला. हे दोन तारे आहेत सर डॉन ब्रॅडमन आणि अर्थातच क्रिकेटचा देव सचिन तेंडूलकर.

  १४ ऑगस्ट १९४८ रोजी डॉन ब्रॅडमन आपला अखेरचा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले होते. ओव्हलच्या मैदानावर प्रतिष्ठेची अ‍ॅशेस मालिका सुरु होती. मात्र, या सामन्यात ब्रॅडमन दुसऱ्या चेंडूवर होलिसची गुगली समजण्यात ब्रॅडमन चुकले आणि बाद होऊन माघारी परतले. तरीही हा सामना ऑस्ट्रेलियानेच जिंकला होता.

  तब्बल ४२ वर्षांनी याच दिवशी १७ वर्षाच्या सचिन तेंडुलकरने मँचेस्टर येथील ओल्ड ड्रॅफर्डच्या मैदानावर आपलं पहिलं वहिलं कसोटी शतक झळकावत सर्वांना आपली दखल घ्यायला भाग पाडलं. इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या डावात अडचणीत सापडलेल्या भारताला सचिनच्या शतकाने वाचवलं.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here