रिक्षात विसरलेले लाख रुपये प्रामाणिक रिक्षावाल्याने केले परत…

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कोरोनामुळे सध्या रिक्षा चालकांच्या धंद्यावर मोठा विपरीत परिणाम झाला आहे. अनेक रिक्षाचालक आर्थिक तंगीत आले आहेत. मात्र, या ही परिस्थितीत एका रिक्षावाल्याने आपल्या रिक्षात प्रवाशाने लाख रुपयांपेक्षा जास्त पैसे असलेली विसरलेली बॅग प्रामाणिक पणे परत केली. 

ही घटना हैदराबाद येथील असून महम्मद हबीब, असे या प्रामाणिक रिक्षावाल्याचे नाव आहे. दोन दिवसापूर्वी या रिक्षावाल्याने महिला प्रवाशाला सोडले होते. त्यांची पैशाची बॅग त्या रिक्षातच विसरल्या. यानंतर दुपारी अडीच वाजल्याच्या दरम्यान मोहम्मद आपल्या नेहमीच्या स्टँडवर परतला. यावेळी पँसेजर सीटकडे पाहिलं असतान मोहम्महला एक बॅग दिसली. या बॅगेत कोणती घातक वस्तू तर नसेल ना या भीतीपोटी मोहम्मदने आपल्या रिक्षामालकाला ती बॅग दाखवली. बॅग तपासली असता त्यात पैसे असल्याचं कळलं. त्या बॅगेत १ लाख ४० हजारांची रक्कम होती. नेमक्या कोणत्या प्रवाशाचे पैसे आहेत हे शोधण्यात अर्थ नव्हता त्यामुळे हबीबने स्थानिक पोलीस ठाण्यात हे पैसे परत करण्याचं ठरवलं. ठरल्याप्रमाणे हबीबने ते पैसे पोलिसांच्या स्वाधिन केले. त्याआधी पैशांची खरी मालक असलेल्या आयेशा या महिलेने पोलीस ठाण्यात आपली बॅग हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

चौकशी केली असतान रिक्षाचालकाने परतवलेली बॅग हीच आयेशा यांची बॅग होती हे लक्षात आलं. यात कोणत्याही प्रकारची अधिकृत तक्रार दाखल झाली नव्हती त्यामुळे आम्ही लगेचच ते पैसे आयेशा यांच्या ताब्यात दिल्याची माहिती स्थानिक पोलीस अधिकारी के. सुदर्शन यांनी दिली. मोहम्मद हबीब याने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे आयेशा यांनी त्याला ५ हजार रुपये बक्षीस दिलं. पोलिसांनीही मोहम्मदचा शाल-श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. आपल्यामुळे महिलेचे पैसे परत मिळाले याचा आनंद मोहम्मदला झाला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here