Karjat : काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद

0

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

कर्जत : कर्जत काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण यांची तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीचे पत्र महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व काँग्रेसचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख यांच्या हस्ते आ सुधीर तांबे, ज्ञानदेव वाफारे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण घुले, कर्जत जामखेड युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन घुले यांच्या उपस्थितीमध्ये देण्यात आले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी, माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या उच्च आदर्शानुसार काँग्रेस पक्षाची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस पक्षाची विचारसरणी आणि कार्य समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी आ. नदीम जावेद, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक कमिटीचे एम एम शेख, आ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर कर्जत तालुका काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या तालुकाध्यक्षपदी माजिद पठाण यांची तर शहराध्यक्षपदी जोहीन सय्यद यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी किरण काळे, कर्जत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, तात्यासाहेब ढेरे, अड कैलाश शेवाळे यांनी नुतन पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here