Karjat : अबब.. शहरात एकाच दिवशी १६ कोरोनाबाधीत, रुग्णसंख्या @ ३७६

3

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री दि १४

कर्जत : शुक्रवारी कर्जत शहरात तब्बल १६ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून तालुक्यात एकूण २४ व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आले असल्याची माहिती तहसिलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे. कर्जत तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णाची एकूण संख्या ३७६ झाली आहे. शुक्रवार, (दि १४) कर्जत तालुक्यात २४ व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक प्राप्त झाला असून यामध्ये सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण कर्जत शहरात आढळून आले आहेत.

कर्जत शहर १६, आंबीजळगाव ३, देशमुखवाडी ३, कोळवडी १ आणि पाटेगाव येथील एका रुग्णाचा समावेश आहे. प्रथमताच कर्जत शहरात एकाच दिवसात १६ कोरोनाबाधीत रुग्ण आढळल्याने शहराची धाकधूक वाढली आहे. आजतागायत कर्जत तालुक्यात एकूण ३७६ कोरोना रुग्ण आढळले असून यामध्ये कर्जत शहरात ६१ तर ग्रामीण भागातील ३१५ कोरोनाबाधीताचा समावेश आहे. शहरातील कोरोनाबाधीत रुग्णाच्या वाढत्या संख्येने नागरिकांनी सतर्कता बाळगणे आवश्यक आहे.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here