Ahmadnagar : इकडचा तिकडे गेला तर पराभव नक्की

0

पालकमंत्री मुश्रीफ यांचा इशारा; आमदार सोडून न जाण्याची खात्री

नगरः ‘राज्यातील आमचे तीन पक्षांच्या आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. एकही आमदार इकडचा तिकडे होणार नाही. जर एखादा आमदार इकडचा तिकडे झाला, तर तो पुन्हा निवडून येणार नाही,’ असा इशारा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी देताना राज्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना भाजपने राज्यसभेचे खासदार केले आहे. त्यामुळे त्यांना असे काहीतरी बोलावेच लागते,’ असेही ते म्हणाले. राज्यातील सरकार फार काळ टिकणार नाही,’ असा दावा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे,. तर राज्यातील सरकारचे लवकरच विसर्जन होईल, असे वक्तव्य आठवले यांनी केले होते. त्यावर मुश्रीफ यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘पार्थ पवार यांच्या बद्दल सुरू असलेल्या प्रकाराबाबत मुश्रीफ यांना विचारले असता त्यांनी हा विषय आजोबा आणि नातवातला आहे, असे सांगत अधिक बोलणे टाळले.

या वेळी त्यांनी टाळेबंदीबाबत भाष्य केले . आता करोनासोबत आपण जगले पाहिजे. त्यामुळे आता टाळेबंदी करण्याची कोणतीही गरज नाही. तसेच आजच्या बैठकीत कोणत्याही लोकप्रतिनिधीने टाळेबंदीची मागणी केली नाही,’ असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here