5 वर्ष गृह खातं सांभाळणा-यांनाच पोलिसांवर विश्वास नसणे हे दुर्दैवी

ग्रामविकास तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जोरदार टोला

ज्यांनी 5 वर्ष गृह खातं साभाळलं त्यांनाच पोलिसांवर विश्वास नाही हे अतिशय दुर्दैवी आहे, असा जोरदार टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. तसेच सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यूचे राजकारण केले जात आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या हस्ते अहमदनगरला झेंडा वंदन पार पडले. यावेळी ते बोलत होते.

हसन मुश्रीफ म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्यानंतर त्यांना बिहारच्या निवडणुकीची जबाबदारी देण्यात येत आहे. हे राजकारण आहे. 5 वर्षे ज्यांनी गृहखातं सांभाळलं तेच आपल्या पोलिसांवर संशय व्यक्त करत आहेत हे दुर्दैव आहे.”

यावेळी हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा मृत्यूदर कमी करणे हे आव्हान असल्याचं नमूद केलं. तसेच प्रशासनाला रुग्णांना तात्काळ बेड उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले.

“आपल्यासमोर सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव हे आव्हान आहे. हा प्रादुर्भाव रोखणं, मृत्यूदर कमी करणं, जी अंत्यवस्थ रुग्ण आहेत त्यांना ताबडतोब बेड मिळतील अशी व्यवस्था करणं, जास्तीत जास्त रुग्णांना लवकर बरं करणं हेच आज आपल्यासमोरचं आव्हान आहे. यासाठी काम सुरु आहे,” असं मत हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here