स्वातंत्र्याचा जल्लोष : विविध ठिकाणी ध्वजारोहण, पाहा फोटो फिचर

0

श्रीरामपूर तालुक्यातील हरेगांव फाटा येथील पोलिस निवारा येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी सरपंच आबासाहेब गवारे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच भारतमाता प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत पोलीस सब इन्स्पेक्टर संतोष बहाकर, राजाराम गवारे,सचिन गायकवाड, अण्णासाहेब गवारे, पुरोहित संघटनेचे तालुका अध्यक्ष अशोक कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रमेश नगरे, अजय राऊत, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अशोकनगर चौकी अंतर्गत पोलिस निवारा येथील पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल लोटके, पोलीस नाईक पोपट खराडे,पो.ना.करमल कोरडे, पोकाॅ किरण पवार, पो कॉ गायकवाड आर आर, पो कॉ आंधळे, गृहरक्षक दलाचे राजेंद्र देसाई,महेश राशिनकर, महिला होमगार्ड जरीना सय्यद, आदी उपस्थित होते.

श्रीगोंदा प्रतिनिधी :- रयत शिक्षण संस्थेच्या श्रीगोंदा शहरातील सर्व संकुलामध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात तसेच एका अभिनव प्रयोगाने साजरा करण्यात आला. तीनही शाखांमध्ये ध्वजारोहण महिला शिक्षिकांच्या हस्ते करून अनोखी मानवंदना देण्यात आली .
श्रीगोंदा शहरामध्ये सर्वात मोठे विद्यालय म्हणून महादजी शिंदे विद्यालयाचा नावलौकिक आहे. यावेळी ध्वजारोहण विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. कुंदा निद्रे यांच्या हस्ते करण्यात आले. श्रीमंत राजमाता विजयाराजे शिंदे कन्या विद्यालयाचे ध्वजारोहण मुख्याध्यापिका वंदना नगरे यांच्या हस्ते करण्यात आले.
अल्पावधित नावारुपाला आलेल्या महादजी शिंदे इंग्लिश मीडियम स्कूल चे ध्वजारोहण ज्येष्ठ शिक्षिका सौ मिना लवांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य तुकाराम कन्हेरकर, उपमुख्याध्यापिका सौ.चौधरी, पर्यवेक्षक उत्तम बुधवंत व दिलीप भुजबळ, जेष्ठ शिक्षक वसंत दरेकर, विलास दरेकर, संतोष शिंदे, गुरुकुलप्रमुख विलास लबडे व राजेंद्र खेडकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल दरेकर व सचिन झगडे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here