Rahuri : Rashtra Sahyadri impact : स्वच्छ पाणी पुरवठ्यासाठी प्रशासनाची मोहीम

प्रतिनिधी | राष्ट्र सह्याद्री 

राष्ट्र सह्याद्रीच्या बातमीचा सकारात्मक परिणाम होताना दिसत आहे. नागरिकांना स्वच्छ पाणी पुरवठा व्हावा यासाठी प्रशासनाने मोहीम सुरू केली आहे. 

राहुरी शहरात झालाय विकासाचा बट्ट्याबोळ मंत्र्यांच्या प्रभागातच नागरिक पितात मैलामिश्रीत सांडपाणी या मुख्य मथळ्या खालील बातमी दैनिक राष्ट्र सह्याद्री मधे प्रकाशित झाली होती. राहुरी शहराच्या प्रभागातील नागरिकांनी राष्ट्र सह्याद्रीच्या संपूर्ण टीमचे कौतुक करत प्रभागातील पाणीपुरवठा, सांडपाणी तसेच विविध समस्यांची दखल घेतल्याबद्दल अभिनंदन केले होते.

यानुसार राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, राहुरी नगरपरिषदेचे प्रभारी नगराध्यक्ष व प्रशासनानेही वृत्ताची दखल घेऊन तातडीने कारवाई सुरु करत ज्या ठिकाणी मैलामिश्रीत सांडपाणी गटारीतून गेलेल्या पिण्याच्या पाईपलाईनद्वारे नागरिकांच्या घरात नळावाटे जात आहे. तेथील पिण्याच्या पाईपलाईन, गटारी, सांडपाणी निचरा व्यवस्थित होण्यासाठी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेत स्वच्छ पाण्याच्या पुरवठा होण्याकामी मोहीम राबवत प्रभागात नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे काकासाहेब आढागळे, बांधकाम विभाग प्रमुख सुनिल कुमावत, आरोग्य विभाग प्रमुख राजेंद्र जाधव, आरोग्य विभाग सुपरवायझर जया भवरे सह कर्मचारी अधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here